यूएई सरकारने लॉकडाऊन काळात लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी काही बॉलिवूड विनोदी चित्रपटांचे प्रर्दशन करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार-करीना कपूर या जोडीचा “गुड न्युज’ आणि आयुष्मान खुराना याचा “ड्रिम गर्ल’ हा चित्रपट यूएईमधील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.
“दुबईने माझ्यावर आणि माझ्या चित्रपटांवर नेहमीच प्रेम केले आहे, गुड न्युज हा चित्रपट पुन्हा प्रेषकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल, अशी प्रतिक्रिया अक्षय कुमार याने दिली आहे. गुड न्युज हा चित्रपट करण जोहरने बनवला आहे.
या चित्रपटात अक्षय-करीना साबेतच कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांनी प्रमुख पात्र साकारले आहे. या चित्रपटाने भारतात प्रेषकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. त्याचबरोबर आयुष्मान खुराना याचा “ड्रिम गर्ल’ हा चित्रपट पाहतानाही प्रेषक लोटपोट झाले होते.
हा चित्रपट अशा एका मुलावर आधारित आहे, ज्याला मुलीचा आवाज काढून बोलण्याची नोकरी करावी लागते. यात त्याच्याशी बोलणारे लोक त्याला मुलगी समजून त्याच्या प्रेमात पडतात. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. आता हे दोन्ही चित्रपट पुन्हा दुबईमध्ये प्रदर्शित होत आहेत.