भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघात डाव्या कोपर्यात बचावपटूची भूमिका निभाणार्या गिरीश मारुती एरनाकचा जन्म मुंबईतील कल्याण येथे 22 डिसेंबर 1992 रोजी झाला. 2018 मध्ये दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य गिरिश यंदाच्या प्रो कबड्डी लीगच्या हंगामात गुजरात फॉर्च्युन जायंट्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कबड्डीत कोणताही रस नसलेल्या गिरीशने त्याच्या शाळेच्या क्रीडा प्रशिक्षकाच्या सांगन्यावरुन कबड्डी खेळायला सुरुवात केली. आणि पुढे शालेय स्पर्धांमध्ये आपल्या बचाव कौशल्यामुळे प्रचंड लोप्रियता मिळवली.
गिरीशने खूप कमी कालावधीत खेळात प्रभुत्व मिळवले. परंतु सराव आणि खेळासाठी निरोगी आहार घेण्यासाठी त्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. कबड्डीचा आर्थिक खर्च भागवण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रे विकायला सुरुवात केली आणि बरोबरच खेळावरही लक्ष केंद्रीत केले.
गिरीशने अनेक आंतरशालेय स्पर्धा आणि जिल्हा स्तरावर आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व केले. काही वर्षांनी त्यांची महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ कबड्डी संघात निवड झाली. पुढे 2014 मध्ये प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामात पटना पायरेट्सच्या संघात निवड झाल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
पदार्पणाच्या हंगामात, गिरीशने 12 सामन्यांमध्ये एका सुपर टॅकलसह बचाव फळीत 23 गुणे मिळवले. स्पर्धेच्या दुसर्या आणि पायरेट्ससोबतच्या त्याच्या शेवटच्या हंगामात, त्याने 13 सामन्यांमध्ये 27 गुण पटकावले. पुढे गिरीशला या स्पर्धेत बंगाल वॉरियर्स, पुणेरी पलटण आणि गुजरात फॉर्च्युन जायंट्सचे प्रतिनिधीत्व केले.
गिरीश एरनाकची कामगिरी :
सामने – 109
एकूण गुण- 280
चढाईतील गुण- 10
बाचावातील गुण- 270