चाकण बाजारात हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी व फ्लॉवरची विक्रमी आवक
महाळुंगे इंगळे-खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, जळगाव भुईमूग शेंगा व लसणाची भरपूर आवक होऊनही त्यांचे भाव कडाडले आहेत. बटाट्याची आवक घटल्याने बटाट्याचे भाव तेजीत राहिले. फळभाज्यांच्या बाजारात हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, भेंडी व दुधी भोपळ्याची प्रचंड आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात या आठवड्यात मेथी, कोथिंबीर व पालक भाजीची भरपूर आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्सी गाय व शेळ्या मेंढ्याच्या संख्येत घट झाली. बैल व म्हैस यांच्या संख्येत मात्र मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 2 कोटी, 85 लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण 750 क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 540 क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात 500 रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 7 हजार रुपयांवरून 7 हजार 500 रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 910 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1,244 क्विंटलने घटल्याने भावात 500 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1 हजार 500 रुपयांवरून 2 हजार रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक 7 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 2 क्विंटलने वाढूनही भावात 300 रुपयांची वाढ झाली. या शेंगाचा भाव 6 हजार रुपयांवरून 6 हजार 300 रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 6 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने वाढूनही लसणाच्या भावात 500 रुपयांची वाढ झाली. लसणाचा कमाल भाव 15 हजार रुपयांवरून 15 हजार 500 रुपयांवर पोहोचला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक 542 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 74 क्विंटलने वाढल्याने या आठवड्यात मिरचीच्या भावात घट झाली. हिरव्या मिरचीला 1 हजार 500 ते 2 हजार 500 रुपये असा कमाल भाव मिळाला.
- राजगुरूनगर बाजार-
राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची 35 हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला 700 ते 1, 400 रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची 18 हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा 400 ते 1, 700 रुपये एवढा भाव मिळाला. शेपूची एकूण आवक 7 हजार 500 जुड्या झाली असून, 600 ते 1, 400 रुपये असा भाव मिळाला. राजगुरुनगर येथील मुख्य बाजार व शेलपिंपळगाव येथील उपबाजारात पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. - चाकण बाजार-
चाकण बाजारात मेथीची 14 हजार 320 जुड्यांची आवक होवून मेथीला 1,000 ते 1,400 रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची 17 हजार 060 जुड्यांची आवक होऊन 1,000 ते 2,000 रुपये प्रतिशेकडा भाव मिळाला. शेपूची 3 हजार 050 जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा 800 ते 1,200 रुपये एवढा भाव मिळाला. पालक भाजीची 2 हजार 200 जुड्यांची आवक होऊन 600 ते 1, 000 रुपये भाव मिळाला. - शेलपिंपळगाव बाजार-
शेलपिंपळगाव येथील उपबाजारात मेथीची 1 हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला 800 ते 1, 300 रुपये प्रतीशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीरीची 1 हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना 1, 400 ते 2, 800 रुपये एवढा भाव मिळाला. येथील बाजारात शेपू व पालक भाजीची काहीच आवक झाली नाही. - शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव प्रतिक्विंटल
कांदा आवक – 750 क्विंटल
भाव क्रमांक 1- 7,500 रुपये
भाव क्रमांक 2- 5,000 रुपये
भाव क्रमांक 3- 2,000 रुपये
बटाटा आवक – 910 क्विंटल
भाव क्रमांक 1- 2,000 रुपये
भाव क्रमांक 2- 1,400 रुपये
भाव क्रमांक 3- 1 000 रुपये - फळभाज्या आवक डागांमध्ये व कंसात प्रती 10 किलोंसाठी मिळालेले भाव –
टोमॅटो -1350 पेट्या (800 ते 1200), कोबी – 360 पोती (1200 ते 1800), फ्लॉवर – 340 पोती (1200 ते 1800), वांगी – 416 पोती (4000 ते 5000), भेंडी – 410 पोती (3000 ते 4000), दोडका – 280 पोती (3000 ते 5000), कारली – 312 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा – 315 पोती (1200 ते 1800), काकडी – 410 पोती (1000 ते 1600), फरशी – 225 पोती (1500 ते 2500), वालवड – 332 पोती (3000 ते 6000), गवार – 350 पोती (4000 ते 5000), ढोबळी मिरची – 320 डाग (2000 ते 3000), चवळी – 182 पोती (2500 ते 3500), वाटाणा – 540 पोती (3000 ते 4000), शेवगा – 20 पोती (6000 ते 10000), गाजर – 160 पोती (3000 ते 4000) - जनावरे – चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 105 जर्शी गायींपैकी 67 गाईची विक्री झाली. ( 10, 000 ते 55, 000 रुपये ), 172 बैलांपैकी 144 बैलांची विक्री झाली. ( 10, 000 ते 35, 000 रुपये ), 188 म्हशींपैकी 139 म्हशींची विक्री झाली. ( 20, 000 ते 70, 000 रुपये ), शेळ्या – मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 5, 745 शेळ्या – मेंढ्यापैकी 5, 355 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1, 200 ते 10, 000 रुपये इतका भाव मिळाला.