पळसदेव, (प्रतिनिधी) – पळसदेव तालुका इंदापूर येथील एल. जी. बनसुडे विद्यालयाचा एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये शंभर टक्के निकाल लागला. यामध्ये दोन्ही परीक्षेत एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले व विद्यालयाची निकालाची परंपरा कायम राखली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष शीतल कुमार शहा, कार्याध्यक्षा नंदा बनसुडे, सचिव नितीन बनसुडे यांनी अभिनंदन केले.
या वेळी एलिमेंट्री परीक्षेमध्ये मानसी मदने, प्रीती भोसले, जान्हवी बनसुडे यांना अ श्रेणी मिळाली. दीपक राऊत, श्रावणी पिसाळ, स्नेहल राहुल मदने, अक्षरा बनसुडे, तेजस्विनी पोतेकर, ऋतुजा शिंदे यांना ब श्रेणी मिळाली व ६ विद्यार्थ्यांना सी श्रेणी मिळाली. तसेच इंटरमिजिएट परीक्षेमध्ये आर्या बनसुडे, स्वराली शेलार, वैभवी झणझणे, जान्हवी हेंद्रे, सुजाता भोसले, जयश्री लावंड यांनी अ श्रेणी प्राप्त केली तर सृष्टी बनसुडे, ओमराजे जंजिरे यांच्यासह इतर चार विद्यार्थ्यांना ब श्रेणी व सहा विद्यार्थ्यांना सी श्रेणी मिळवून प्रावीण्य मिळवले. परीक्षेस पात्र झालेले परीक्षार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रतिभा भोसले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, दीपक शिंदे, वर्षा सावंत, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.