Forbes Rich List 2024 Indians: Forbes ने 2024 सालासाठी जगातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी या यादीत 169 भारतीय होते, आता त्यात 200 भारतीयांची नावे जोडली गेली आहेत. या भारतीयांची एकूण संपत्ती 954 अब्ज डॉलर्स आहे, जी गेल्या वर्षी 675 अब्ज डॉलर्स होती. याचा अर्थ एकूण संपत्ती यंदा 41 टक्क्यांनी अधिक आहे. जाणून घ्या, कोण आहेत टॉपचे श्रीमंत आणि कोण आहे सर्वात श्रीमंत महिला?
फोर्ब्स यादी 2024: या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $83 अब्ज वरून $116 अब्ज झाली आहे. यामुळे 100 अब्ज डॉलर क्लबमध्ये सामील होणारे ते पहिले आशियाई बनले आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत. ते भारत आणि आशिया या दोन्ही ठिकाणी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत, त्यांची एकूण संपत्ती 36.8 अब्ज डॉलरने वाढली आहे. 84 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 17 व्या स्थानावर आहेत.
🚨 India’s Top 10 richest people according to Forbes Richest List 2024
➡️ Mukesh Ambani – $116 billion
➡️ Gautam Adani – $84 billion
➡️ Shiva Nadar – $36.9 billion
➡️ Savitri Jindal – $33.5 billion
➡️ Dilip Shanghvi – $26.7 billion
➡️ Cyrus Poonawalla – $21.3 billion… pic.twitter.com/ldfNHzTyXt— Bharat Tech & Infra (@BharatTechIND) April 3, 2024
भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहे?
फोर्ब्स लिस्ट 2024 नुसार, सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. वर्षभरापूर्वी त्या सहाव्या स्थानावर होत्या पण आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये चौथ्या स्थानावर आल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 33.5 अब्ज डॉलर म्हणजे 27 ट्रिलियन रुपयांहून अधिक आहे.
यादीबाहेर कोण ?
या यादीत 25 नवीन भारतीय अब्जाधीशही सामील झाले आहेत. यामध्ये रमेश कुन्हीकन्नन, नरेश त्रेहान आणि रेणुका जगतियानी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय बायजू रवींद्रन आणि रोहिका मिस्त्री यांना यादीतून वगळण्यात आले आहे.
भारतातील शीर्ष 10 श्रीमंत लोक (India’s 10 richest people)
-मुकेश अंबानी- $116 अब्ज संपत्ती
-गौतम अदानी- $84 अब्ज संपत्ती
-शिव नाडर- $36.9 अब्ज निव्वळ संपत्ती
-सावित्री जिंदाल- $33.5 अब्ज संपत्ती
– दिलीप सांघवी- $26.7 अब्ज निव्वळ संपत्ती
-सायरस पूनावाला- $21.3 अब्ज संपत्ती
-कुशाल पाल सिंग- $20.9 अब्ज संपत्ती
-कुमार बिर्ला – $19.7 अब्ज संपत्ती
-राधाकिशन दमानी- $17.6 अब्ज निव्वळ संपत्ती
-लक्ष्मी मित्तल- $16.4 अब्ज संपत्ती