चंदीगड -‘फ्लाईंग सिख’ नावाने प्रसिद्ध असलेले महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती आता स्थिर आहे. गुरुवारी त्यांची ऑक्सिजन पातळी घसरली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांनी म्हटलं की, मिल्खा सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ऑक्सिजन पातळी देखील स्थिर आहे. मात्र अद्याप त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. करोनामुळे तब्येत खराब झाल्यानंतर मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत सुधार होत असून तीन डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
९१ वर्षीय मिल्खा सिंग यांना सुरुवातीला फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर गुरुवारी त्यांना चंदीगडच्या पीजीआयमध्ये भरती करण्यात आलं. फोर्टीसमधून सुट्टी मिळाल्याच्या चार दिवसांनी मिल्खा सिंग यांना श्वास घेण्यास अडचण सुरू झाली होती. तर मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मला अद्याप फोर्टीस रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत.