मुंबई – अनेकदा चित्रपट पाहताना प्रेक्षक त्यातील पात्रांमध्ये इतके हरवून जातात की आपण त्याजागी असतो तर काय केले असते याचा देखील विचार करायला लागतात. दृश्यम २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. यातील छोटी छोटी पात्र देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. कमलेश सावंत यांनी साकारलेली इन्स्पेक्टर गायतोंडेची भूमिका कोण कस विसरू शकेल. यावरूनच आपल्याला शिवीगाळ आणि धमकीचे फोन आल्याचा किस्सा कमलेश यांनी नुकताच सांगितला.
पाहताक्षणी डोक्यात सणक जाईल असा लूक आणि आवाज ऐकल्यावर प्रचंड राग येईल असा अभिनय कमलेश सावंत यांनी दृश्यम २ मध्ये साकारला. एका मुलाखतीत कमलेश यांनी सांगितलं की,एका वाहिनीने आपल्या सोशल मीडियावर प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता जात तुम्हाला गायतोंडे खऱ्या आयुष्यात भेटला तर तुम्ही काय कराल ? त्यावर आलेली उत्तर शॉकिंग होती असं कमलेश सांगतात.जीव घेण्यापर्यंत ठीक आहे परंतु त्यानंतर देखील काय करावं हे लोकांनी यावेळी सांगितलं होत.
एवढच नाही तर कमलेश यांना धमक्या देणारे फोन देखील आल्याचे त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. ते म्हणाले,मी सहसा अनोळखी फोन उचलत नाही. परत्नू एका रात्री उशिरा आलेला फोन मी उचलला आणि समोरून आई बहिणीवरून शिव्या सुरु झाल्या. त्यानंतर मी फोन कट करून नंबर ब्लॉक केल्याचे ते सांगतात. यानंतरही तब्बल ५ वेळा पुन्हा असं घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या अभिनयाची कदाचित हीच पावती असावी असं कमलेश सावंत यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.