मुंबई – रोहित शेट्टीच्या फेमस कॉप युनिव्हर्समध्ये दीपिका पदुकोणने एन्ट्री केली आहे. दिग्दर्शक रोहितच्या ‘सिंघम अगेन’ या नव्या चित्रपटात दीपिका एका पोलिस महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदाच आपल्या चित्रपटात पोलीस स्त्री दाखवणार आहे. ही बातमी समोर येताच दीपिका पदुकोण आणि सिंघम चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
त्याहूनही आनंदाची गोष्ट म्हणजे ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून अजय देवगण पुन्हा एकदा पडद्यावर आपल्या प्रसिद्ध बाजीराव सिंघमची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा अजय आणि दीपिका एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दीपिका पदुकोणला लेडी सिंघमच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आधीच उत्सुक आहेत.
2011 मध्ये अजय देवगणने ‘सिंघम’ या चित्रपटाद्वारे कॉप युनिव्हर्सची सुरुवात केली. यामध्ये अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका साकारली आणि तो देशभर लोकप्रिय झाला. 2014 साली ‘सिंघम रिटर्न्स’ हा चित्रपट आला होता. यामध्ये अजयसोबत करीना कपूर खान दिसली होती. मात्र, या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेत्री दिसणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे.
दीपिका पदुकोणच्या आधी तिचा पती रणवीर सिंग देखील रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा भाग बनला आहे. ‘सिम्बा’ चित्रपटात रणवीरने जबरदस्त काम दाखवले होते. त्यांनी पोलिस संग्राम भालेराव यांची भूमिका केली होती. त्यांची ही फनी स्टाइल खूप आवडली होती. रणवीर आणि अजयशिवाय रोहित शेट्टीनेही अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट बनवला आहे.
दीपिका पदुकोणच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे तर तिच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे शाहरुख खानचा ‘जवान’, हृतिक रोशनचा ‘फाइटर’ आणि प्रभासचा ‘प्रोजेक्ट के’ हा आणखी एक चित्रपट आहे. याशिवाय ती रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांच्या ‘सर्कस’ या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.