मुंबई – टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर आज इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ‘ये मेरी लाइफ है’ या टीव्ही शोमधून शमाला विशेष ओळख मिळाली. या शोमध्ये तिच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक देखील केलं. सध्या शमा लंडनमध्ये आहे. लंडनच्या रस्त्यावरील तिचे काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताहेत .
शमाने टीव्ही शो तसेच अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच ती तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावरही चर्चेत असते. शमा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते.शमाने लंडनच्या रस्त्यांवरून शेअर केलेले फोटो सध्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत.
शमा सिकंदर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिने ये मेरी लाइफ है, मन में है विश्वास आणि सीआयडी सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कास्टिंग काउचवर भाष्य करत एकच खळबळ उडवून दिली होती. आता शमाने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत.
शमा सिकंदरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे शमा तिची किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. फोटोंमध्ये तिने ग्रीन कलरचा स्किन फिट डीप नेक ड्रेस घातला आहे. या ड्रेससोबत अभिनेत्रीने गोल्डन हाय हिल्स कॅरी केल्या होत्या. त्याचबरोबर तिने आपले केस खुले ठेवले आहेत, ज्यामुळे ती आणखीनच हॉट दिसत आहे.
शमाने एका हातात ब्रेसलेट आणि कानात झुमके घातले आहेत. या ड्रेसमध्ये शमाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. विशेष म्हणजे शमाच्या बॅग्राऊंडला असलेले लाइटिंग देखील खूप आकर्षक दिसत आहे. हे फोटो शेअर करत शमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लंडनमधील एक संध्याकाळ.’