पुणे – दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरील सेवावर्ती सखी या कार्यक्रमात 1 मार्चला दुपारी 12 वाजता पुणे येथील डॉ. भार्गवी बडे महिलांचे आरोग्य व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. बीड येथील भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव फड यांंच्या त्या कन्या आहेत.
पुणे (आळंदी) येथे विघ्नहर्ता साई हाॅस्पिटल आणि लॅबोरेटरीच्या माध्यमातून डॉ. बडे यांनी आरोग्य क्षेत्रात काम करताना व्यसनमुक्तीवर उल्लेखनिय कार्य केले आहे. गरजु लोकांना त्यांनी मोफत प्रथमोपचार प्रशिक्षणही दिले आहे. विशेष म्हणजे संक्रांतीला हळदी कुंंकवाचे वाण म्हणून महिलांना प्रथमोपचार प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल सह्याद्री वाहिनीवरील सेवावर्ती सखी कार्यक्रमात दि.1 मार्च रोजी दु.12वा. त्यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. स्वाती प्रभू यांनी ही मुलाखत घेतली आहे.