श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरच्या राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने नांदूर शिवार (ता. राहाता) या ठिकाणी हातभट्टी गावठी दारू निर्मिती करणाऱ्या केंद्रावर कारवाई केली.
नांदूर शिवार येथे गावठी दारूनिर्मिती केंद्रावर छापे टाकून अवैध हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांनी दिली.
४१८० ली.कच्चे रसायन व ३०० ली . हातभट्टी गावठी दारू व हातभट्टी गावठी दारूनिर्मितीचे लोखंडी व प्लॅस्टिक बॅरल व इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ४ हजार ८०० इतकी आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध हातभट्टी गावठी दारूनिर्मिती व विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचा इशारा निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांनी दिला.