पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी अमृता कुलकर्णी यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सचिन मिणियार, सचिवपदी हृषिकेश बडवे, खजिनदारपदी मोशमी शहा यांची, तर “विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी प्रणव आपटे यांची निवड झाली आहे.
२०२४-२०२५ या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष अमृता कुलकर्णी यांनी मावळते अध्यक्ष राजेश अग्रवाल यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेश अग्रवाल, काशिनाथ पठारे, प्रितेश मुनोत, अजिंक्य रणदिवे काम पाहतील