आळंदी – येथील पद्मावती रोडवरील भगवानगड मंगल कार्यालयाजवळून आयशर टेम्पो चोरीला गेला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक गोविंद राख (30) यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोविंद राख हे आयशर टेम्पोवर चालक म्हणून कामाला आहेत. त्यांनी सोमवारी (दि. 20 नोव्हेंबर) सायंकाळी 5 वाजता आयशर प्रो 1110 टेम्पो क्र. (एम.एच. 04 जे.के. 5294) हा भगवानगड मंगल कार्यालयाच्या डाव्या बाजूला पार्क केला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी (दि.22) रात्री पाहिले असता त्यांना सदर टेम्पो जागेवर दिसला नाही. त्यानंतर त्यांनी आळंदीसह परिसरात शोधाशोध केली मात्र त्यांना टेम्पो मिळाला नाही. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.