पुणे – आम आदमी संघटनेच्यावतीने पणन विभागाचे सहसंचालक विनायक कोकरे यांची भेट घेण्यात आली. मार्केट यार्ड मध्ये फळ आणि भाजीपाला क्षेत्रात लावण्यात आलेले पार्किंग
शुल्कासंदर्भात त्यांना माहिती दिली, त्यांनी त्याचा आढावा घेऊन तातडीने बाजार समितीसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेचे श्रीकांत आचार्य यांनी सांगितले.
संघटनेच्यावतीने त्यांना सांगण्यात आले की, बाजार समितीने सांगावे कुठल्या कायद्याअंतर्गत ते पार्किंग शुल्क आकारत आहेत. कारण शेजारी धान्य बाजारात शुल्क आकारले जात नाही.
फक्त फळे आणि भाजी बाजारात का? तसेच फळ आणि भाजी बाजारामध्ये मालाची विक्री ही गाळ्यात समोर रस्त्यावरच होते.