पुणे – आदिवासी भागांतील पाड्यांवर अनेक सुविधांचा अजूनही अभाव आहे. अशा परिस्थितीत दसरा-दिवाळी सारखे सण मर्यादित स्वरूपात साजरे होतात. मात्र, या आदिवासी बांधवांची दिवाळी यंदा काहीशी गोड होणार आहे.
सहयोग फाउंडेशन यमुनानगर निगडी यांच्या प्रयत्नांतून मुगाव ता मुळशी येथील अनेक आदिवासी कुटुंबांना फराळी पदार्थांचे वाटप केले. दरवर्षी दिवाळीनिमित्त ते वेगवेगळ्या ठिकाणी मदत करत असतात. कधीतरी गोडाचे पदार्थ खाणार्या या लोकांच्या चेहर्यावरील आनंद खूप मोठं समाधान देऊन जातो, असे फाउंडेशनचे पदाधिकारी सांगतात.
यावेळी याकामी सहयोग फाउंडेशन चे ज्येष्ठ संस्थापक श्री अनिल (अण्णा )आढी श्री नंदकुमार (आप्पा) कुलकर्णी श्री अजय म्हाळस श्री प्रकाश साकोरे श्री सराफ काका,श्री दिनेश कुलकर्णी सर श्री अशोकराव वाळके पाटील, श्री खैरातकर विकास देशपांडे श्री आदित्य कुलकर्णी श्री धनाजी राव शिंदे , श्री आगरकर काका यांनी परिश्रम घेतले. यासाठी मुळशी तालुक्यातील शिक्षक श्री पवार आणि सरपंच श्री मारुती मगरळे यांनी विशेष सहकार्य केले