पुणे (प्रतिनिधी)- पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे व खजिनदार संजय भोसले यांच्या प्रयत्नाने पुणे स्टेशन विभागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना किराणा मालाचे वाटप नितीन मोहिते व विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संदीप पवार ,स्वप्नील चौरे,संतोष शिंदे,सजीत नायर दैनिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख अशोक पाटील व सुनील धापटे यांनी केले याप्रसंगी ज्येष्ठ विक्रेते व सल्लागार शरद वालगुडे,नामदेव डाळिंबे, रवींद्र सूर्यवंशी, जयराम पिल्ले,राहुल पाटोळे व इतर विक्रेते बांधव उपस्थित होते.