पुणे – ढिशक्याॅंव हा मराठी चित्रपट 10 फेब्रुवारी ला महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात मोठ्या जल्लोषात प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे श्रेयस देशपांडे यांनी मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात दमदार मुसंडी मारलेली दिसून येते. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय याच बरोबर संगीत संयोजन हि एक जबरदस्त जमेची बाजू असणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रथमेश परब, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा ह्या मोठमोठ्या कलाकारांनी सजलेल्या ढिशक्यांवू या चित्रपटाला नांदेड च्या श्रेयस नी संगीतबद्धय केले आहे.
या चित्रपटाची निर्मिती ऍक्ट प्लॅनेट प्रोडक्शन अंतर्गत निर्माता उमेश मोहोळकर आणि मोहम्मद देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रितम एस.के.पाटील यांनी यशस्वीपणे दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, गीतकार सनकी सौरभ यांनी कर्णमधुर गीते लिहिली असून श्रेयस देशपांडे यांनी उत्तमपणे गीतांना चाली लावून संगीतबद्ध केलेली असून प्रसारमाध्यमांतून गाणी गाजत आहेत.
मुळचा नांदेड चा पण सध्या पुणे येथील झील एज्युकेशन सोसायटीचे कल्चरल हेड हे पद यशस्वीपणे सांभाळत श्रेयसचे आतापर्यंत बेधुंद मी,साथ असतानां तू,सेहमा सा, पुण्यातली लव्हस्टोरी असे बरेच संगीत अल्बम प्रसिद्ध झाले असून प्रजासत्ताक दिनानिमित्त बालकामगाराच्या जीवनात राष्ट्रभक्ती चे चैतन्य निर्माण करणे करिता लहरायेगा तिरंगा जे कि हिंदी इंडियन आयडल स्टार आशिष कुलकर्णी याने गायले आहे ह्याचे देखील संगीत श्रेयस ने दिले आहे.
या गाण्याला भरपूर प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे सोशल मीडिया वर या संगीत अल्बम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. झील रिकार्डिंग स्टुडिओचे श्रेयस देशपांडे यांनी श्रेयस रेकॉर्डस् लेबल च्या माध्यमातून टाॅक टेल्स वीथ श्रेयस मध्ये अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती घेऊन त्या वैशिष्ट्यपूर्ण ठरविल्या आहेत.
यात प्रामुख्याने आयर्न मॅन आय.पी.एस.कृष्णप्रकाश, मराठी चित्रपट अभिनेते सौरभ गोखले, गाजलेला मराठी चित्रपट पावनखिंडचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, दुनियादारी चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव, अभिनेते संतोष जुवेकर, धर्मवीर चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका केलेला अभिनेता क्षितीज दाते, अभिनेता समीर धर्माधिकारी, प्रथमेश परब, विनोदवीर सिध्दार्थ जाधव यांच्या मुलाखती विशेष गाजल्या आहेत.
सुप्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म MX प्लेअर वर प्रदर्शित झालेली निब्बा निब्बी या वेब सिरीज ला श्रेयस देशपांडे यांनी संगीतबद्ध केले आहे तसेच अनेक जिंगल्सही त्याने संगीतबद्ध केलेल्या आहेत. आज पर्यंत श्रेयस ने चार मराठी चित्रपट संगीतबद्ध केले असून ढिशक्याॅंव हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. नांदेड च्या सर्व चित्रपट गृहांमध्ये मध्ये श्रेयस चा ढिशक्यांऊ हा सिनेमा रूजू झाला आहे. गेल्या आठ वर्षांपासून संगीत क्षेत्रामध्ये कष्ट करणारा श्रेयस दिवसेंदिवस नांदेड चे आणि त्याच्या परिवाराचे ऋण ठेऊन प्रगती पथावर वाटचाल करत आहे. श्रेयसच्या या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.