कोल्हार – संत महिपती महाराज यांच्या भेटीसाठी विठुराया ज्या गावात रात्रभर विश्रांतीसाठी थांबले होते, त्या श्री क्षेत्र कोल्हार खुर्द येथून दि. 15 जून रोजी ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिरासमोरून संत सावता महाराज पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
कोल्हार खुर्द येथून गेल्या 48 वर्षांपासून गावातील वारकरी मंडळींनी पंढरपूर वारी सुरू केली आहे. संत सावता महाराज पायी दिंडी सोहळ्यामध्ये गावासह पंचक्रोशीतील वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाला पोहचतात. या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हभप शंकर महाराज लोखंडे, नीलेश महाराज, अनिल महाराज शिरसाठ, महिपती शिरसाठ, सुधाकर घोगरे, राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.