नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बॅंकेने चौथ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला आहे. या तिमाहीत बॅंकेला आपला तोटा कमी करण्यात यश मिळाले आहे.
या तिमाहीत बॅंकेला 1,349 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 1,529 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले होते. सरलेल्या पूर्ण वर्षात बॅंकेला केवळ 887 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
गेल्यावर्षी बॅंकेला 1,121 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कर्ज वसुली वाढल्यामुळे बॅंकेच्या ढोबळ उनुत्पादक मालमत्तेत घट होऊन 16.55 टक्के झाली आहे. गेल्यावर्षी ढोबळ अनुत्पादक मालमत्ता तब्बल 18.92 टक्के इतकी होती.
खराब कर्जापोटी बॅंकेला 3,130 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. बॅंकेचा तोटा कमी झाला आहे, त्यामुळे आगामी काळात बॅंकेची परिस्थिती सुधारण्याची शक्यता असल्यामुळे आज बॅंकेच्या शेअरच्या भावात 8 टक्क्यापर्यंत वाढ झाली असल्याचे दिसून आले.