Grand Chess Tour : डी. गुकेशचा मास्टरस्ट्रोक! कार्लसनला कमजोर समजण्याची चूक पडली महागात

Grand Chess Tourn 2025 Updates : भारताचा स्टार बुद्धिबळ खेळाडू आणि सध्याचा विश्वविजेता डी. गुकेश याने क्रोएशियाच्या झाग्रेब येथे सुरू असलेल्या ग्रँड चेस टूरच्या सहाव्या फेरीत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन याला पराभूत करत मोठे यश मिळवले आहे. या विजयासह डी. गुकेश याने टूर्नामेंटमध्ये १० गुणांसह आघाडी मिळवली आहे. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर डी. गुकेश याने संयुक्तपणे पहिल्या स्थानावर स्वतःला कायम राखले होते.
सामन्यापूर्वी कार्लसनने केला होता मोठा –
चौथ्या फेरीत त्याचा सामना उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव याच्याशी झाला, तर पाचव्या फेरीत त्याने अमेरिकेचा ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना याला पराभूत करत कार्लसनशी भिडण्याची तयारी केली होती. नॉर्वेचा स्टार बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने डी. गुकेश याच्याशी होणाऱ्या या सामन्यापूर्वी सांगितले होते की, तो हा सामना असा खेळेल जणू त्याचा सामना एखाद्या कमकुवत खेळाडूशी आहे. आता कार्लसनला आपल्या या वक्तव्याचा नक्कीच पश्चाताप होत असेल. डी. गुकेशने रॅपिड प्रकारात शानदार कामगिरी करत कार्लसनला पराभूत केले.
कार्लसनला हरवणे नेहमीच खास – डी. गुकेश
Gukesh beats Magnus Carlsen, again. This time, no angry reaction from Carlsen, no look of disbelief from Gukesh. Just a quiet acceptance from both sides that this is no longer an upset, but a new normal #Gukesh #Chess #GrandMasterGukesh #IndianChess #TeamIndia #ChessStar pic.twitter.com/NkySWzkMdE
— Bhavna (@sagi38848) July 4, 2025
हा सामना त्यांच्यातील तीन सामन्यांपैकी पहिला होता. आता उरलेले दोन सामने ब्लिट्झ प्रकारात खेळवले जाणार आहेत. मॅग्नस कार्लसनला हरवणे नेहमीच खास असते, असे डी. गुकेशने त्याला पराभूत केल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना सांगितले. या विजयामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढेल, असे त्याने आपल्या निवेदनात म्हटले. सुरुवातीला माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि मी बऱ्याच गोष्टी चुकवल्या, पण विजयानंतर मला खूप छान वाटत आहे, असेही तो म्हणाला.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराट-सचिनचा विक्रम, SENA देशांमध्ये रचला नवा इतिहास!
खराब कामगिरीचा बसला फटका – मॅग्नस कार्लसन
दुसरीकडे, डी. गुकेशकडून पराभव स्वीकारल्यानंतर मॅग्नस कार्लसनने सांगितले की, त्याने संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरी केली, ज्याचा परिणाम त्याला या सामन्यात भोगावा लागला. माझ्याकडे वेळेची कमतरता होती आणि खरंच मी त्याचा योग्य सामना करू शकलो नाही, असे त्याने कबूल केले. या विजयाचे संपूर्ण श्रेय गुकेशला जाते, त्याने खूप चांगला खेळ केला आणि संधींचा फायदा घेतला, असेही कार्लसनने नमूद केले.





