Chess Competition Pune : अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
Chess Competition Pune : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील व्हीपीएनसीपीएस (VPNCPS) स्कूलमध्ये सकाळी ९ वाजता या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे

Ajitdada Pawar Memorial State Level Chess Competition Pune Nanded City : अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ येत्या रविवारी, २६ जुलै २०२६ रोजी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे (State Level Chess Competition) भव्य आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील व्हीपीएनसीपीएस (VPNCPS) स्कूलमध्ये सकाळी ९ वाजता या स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. या राज्यस्तरीय महामुकाबल्यात भाग घेण्यासाठी महाराष्ट्रभरातील बाल व युवा बुद्धिबळपटूंना आयोजकांकडून निमंत्रित करण्यात आले आहे.
विविध वयोगट अन् मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा –
स्पर्धेत खेळाडूंच्या कौशल्याला वाव देण्यासाठी अंडर-८, अंडर-१०, अंडर-१२ आणि अंडर-१५ हे चार प्रमुख वयोगट ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मुलींसाठी विशेष स्वतंत्र गटही तयार करण्यात आला आहे.
विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव –
प्रत्येक वयोगटातील प्रथम विजेत्यास ₹५,००० रोख व चषक, द्वितीय क्रमांकास ₹३,००० व चषक, तर तृतीय क्रमांकास ₹२,००० रोख व चषक देऊन सन्मानित केले जाईल. चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूंना रोख रक्कम व पदक मिळेल, तर सहाव्या ते दहाव्या क्रमांकापर्यंत येणाऱ्या बालपटूंना पदकाने गौरविण्यात येणार आहे. मुलींच्या गटात प्रथम विजेतीस ₹१,५०० व चषक, द्वितीय क्रमांकास ₹१,००० व चषक आणि तृतीय क्रमांकास पदक दिले जाईल.
अशी करा प्रवेश नोंदणी –
स्पर्धेसाठी १७ जुलै २०२६ पर्यंत नोंदणी करणाऱ्यांसाठी प्रवेश शुल्क ₹६००, तर त्यानंतर ₹७०० निश्चित करण्यात आले आहे. खेळाडू क्यूआर कोडद्वारे (QR Code) थेट ऑनलाइन नोंदणी करू शकतात. ही स्पर्धा ‘अविनाश लागड युवा फाउंडेशन’, ‘पासलकर चेस अकॅडमी’ आणि ‘व्हीपीएनसीपीएस स्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे.






