Praggnanandhaa Scripts History : २१ वर्षीय आर. प्रज्ञानानंदने रचला नवा इतिहास! ‘ग्रँड चेस टूर’चे जेतेपद पटकावणारा ठरला पहिलाच भारतीय
Praggnanandhaa Scripts History : २१ वर्षीय प्रज्ञानंदने 'ग्रँड चेस टूर फायनल्स'च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेचा दिग्गज खेळाडू फॅबियानो कारुआनाचा १५-१३ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले

R Praggnanandhaa Scripts History Wins Grand Chess Tour Finals after beat Fabiano Caruana : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने (R Praggnanandhaa) बुद्धिबळाच्या पटावर पुन्हा एकदा तिरंगा फडकवत इतिहास रचला आहे. २१ वर्षीय प्रज्ञानंदने ‘ग्रँड चेस टूर फायनल्स’च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेचा दिग्गज खेळाडू फॅबियानो कारुआनाचा १५-१३ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह ग्रँड चेस टूरचे जेतेपद पटकावणारा प्रज्ञानंद हा भारताचा पहिलाच बुद्धिबळपटू ठरला आहे.
६ गुणांची पिछाडी भरून काढली; रॅपिड सामन्यांत जबरदस्त पुनरागमन –
अंतिम लढतीची सुरुवात प्रज्ञानंदसाठी अत्यंत खडतर झाली होती. दिवसाच्या सुरुवातीला तो कारुआनापेक्षा ६ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, प्रज्ञानंदने जबरदस्त मानसिक ताकद आणि संयम दाखवत रॅपिड फेरीत धडाकेबाज पुनरागमन केले. त्याने कारुआनाविरुद्धचे दोन्ही रॅपिड सामने जिंकून सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. त्यानंतर झालेल्या चार डावांच्या ब्लिट्झ फेरीत स्वतःची आघाडी कायम राखत त्याने १५-१३ अशा फरकाने ऐतिहासिक जेतेपदाला गवसणी घातली.
१.९१ कोटींचे घसघशीत बक्षीस; ११ पर्वांत पहिल्यांदाच भारताचा डंका –
🔥 PRAGG STRIKES BACK!
Praggnanandhaa wins the first rapid game against Fabiano Caruana, earning 4 points and cutting Fabi’s lead to just 2 points! ⚡
The fight for the GCT Finals title is wide open again, we have one more rapid game to go before blitz! 👀#Grandchesstour… pic.twitter.com/9fe5aoGwkU— Grand Chess Tour (@GrandChessTour) August 27, 2026
ग्रँड चेस टूरच्या ११ पर्वांच्या प्रदीर्घ इतिहासात आतापर्यंत एकाही भारतीय खेळाडूला हे मानाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. प्रज्ञानंदने हा दुष्काळ संपवून भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. या विजेतेपदासह प्रज्ञानंदला तब्बल २ लाख डॉलर्स (सुमारे १.९१ कोटी रुपये) एवढी घसघशीत बक्षीस रक्कम मिळाली. उपविजेत्या कारुआनाला १.२५ लाख डॉलर्स, तिसऱ्या स्थानावरील वेस्ली सोला ७५ हजार डॉलर्स, तर व्हिन्सेंट कीमरला ५० हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले. या तिघांनीही पुढील हंगामासाठी थेट पात्रता मिळवली आहे.
मॅग्नस कार्लसनच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री; प्रज्ञानंदच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण –
🏆 Praggnanandhaa Rameshbabu has won the 2026 Grand Chess Tour!
The Indian GM produced a stunning comeback in the final, overturning a six-point deficit against Fabiano Caruana on the last day to secure a 15–13 victory and claim one of the most prestigious titles in elite chess.… pic.twitter.com/tkVBmWjA7T
— International Chess Federation (@FIDE_chess) August 28, 2026
ग्रँड चेस टूरच्या इतिहासात आतापर्यंत मॅग्नस कार्लसन, वेस्ली सो, अलीरेझा फिरोझा आणि फॅबियानो कारुआना यांनी प्रत्येकी दोनदा हा किताब जिंकला आहे. आता अवघ्या २१ व्या वर्षी या जागतिक दिग्गजांच्या पंक्तीत प्रज्ञानंदने आपले स्थान निश्चित केले आहे. प्रज्ञानंदच्या क्रीडा कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि संस्मरणीय कामगिरी मानली जात असून, संपूर्ण क्रीडा जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





