Hikaru Nakamura Controversy : हिकारू नाकामुराने का फेकला डी गुकेशचा किंग? संपूर्ण सत्य आलं समोर

Hikaru Nakamura Controversy Video : टेक्सास येथील पहिल्या ‘चेकमेट: अमेरिका विरुद्ध भारत’ बुद्धिबळ स्पर्धेत यजमान अमेरिका संघाने भारतीय संघाला 5-0 अशा एकतर्फी विजयाने पराभूत केले. या रोमांचक स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळाले, परंतु निर्णायक क्षणी अमेरिकन खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवत भारतीय खेळाडूंना कोणतीही संधी दिली नाही.
अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुराने जागतिक विजेता डी. गुकेश याला पराभूत केले, तर फाबियानो कारुआनाने अर्जुन एरिगेसी याला हरवत संघाला आघाडी मिळवून दिली. याशिवाय, आंतरराष्ट्रीय मास्टर कारिसा यिपने ग्रँडमास्टर दिव्या देशमुखवर विजय मिळवला. लेव्ही रोजमॅनने सागर शहाचा पराभव केला, तर टॅनी एडेवुमीने ईथन वैज याला हरवत अमेरिकेला 5-0 असा दमदार विजय मिळवून दिला.
हिकारू नाकामुराचा गुकेशच्या किंगसह वादग्रस्त कृत्य –
That moment when @GMHikaru Nakamura turned around a lost position and checkmated World Champion Gukesh – picking up and throwing Gukesh’s king to the crowd, celebrating the 5-0 win of Team USA over Team India!
Video: @adityasurroy21 pic.twitter.com/GuIlkm0GIe
— ChessBase India (@ChessbaseIndia) October 5, 2025
स्पर्धेदरम्यान एक विचित्र आणि वादग्रस्त घटना घडली. डी. गुकेश याला पराभूत केल्यानंतर हिकारू नाकामुराने गुकेशचा किंग उचलून प्रेक्षकांच्या दिशेने फेकला, ज्यामुळे वातावरण तापले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि बुद्धिबळप्रेमींनी याला असभ्य आणि अशोभनीय ठरवत नाकामुराची कठोर टीका केली. रशियन ग्रँडमास्टर व्लादिमीर क्रॅमनिक यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत नाकामुरावर आधुनिक बुद्धिबळाच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याचा आरोप केला. मात्र, नंतर असे उघड झाले की, नाकामुराचे हे कृत्य आयोजकांनी ठरवलेल्या स्क्रिप्टचा भाग होते.
The event was a show. Fans were ecstatic. Players were encouraged to behave accordingly. All true.
Now, for better or worse, name me one top player who would do what Hikaru did.
— Emilchess (@EmilSutovsky) October 5, 2025
हेही वाचा – IND W vs PAK W : भारताने सलग १२ व्यांदा पाकिस्तानचा उडवला धुव्वा, विश्वचषकात पाचव्यांदा चारली धूळ
आयोजकांचा होता नियोजित डाव –
HIKARU THROWS A PIECE TO THE CROWD TO CELEBRATE THE USA 5-0! @GMHikaru
What an event!! 🔥👏 @CheckmateUSAIND pic.twitter.com/LGnM8JLulJ
— Chess.com (@chesscom) October 5, 2025
बुद्धिबळ तज्ज्ञ लेव्ही रोजमॅन यांनी आपल्या यूट्यूब व्हिडीओत स्पष्ट केले की, संदर्भाविना पाहिल्यास ही कृती असभ्य वाटू शकते, परंतु आयोजकांनीच आम्हाला असे करण्यास सांगितले होते. मनोरंजनासाठी विजेत्याला किंग फेकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नाकामुराने नंतर गुकेशशी बोलून स्पष्ट केले की, हा केवळ शोचा भाग होता आणि यात कोणताही अपमान करण्याचा हेतू नव्हता.
हेही वाचा – Abhishek Sharma : अभिषेक आशिया कपमध्ये जिंकलेली ‘HAVAL H9’ कार भारतात चालवू शकणार नाही, नेमकं कारण काय?
हा अविस्मरणीय अनुभव होता –
नाकामुराने आपल्या यूट्यूब चॅनेलवर या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम लाइव्ह अनुभवांपैकी एक होती. “बुद्धिबळ ही सहसा एकाकी प्रवास असते, पण या स्पर्धेत सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला. भारतीय खेळाडूंनीही पराभव पत्करून या अनुभवाचा आनंद लुटला. ही स्पर्धा आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच उत्तम ठरली,” असे त्याने सांगितले.





