Who is R Vaishali : ‘सहाव्या वर्षी सुरुवात अन् २४ व्या वर्षी जगावर राज्य!’ कोण आहे आर. वैशाली? जाणून घ्या
Who is R Vaishali : आर. वैशाली हिने सायप्रसमध्ये झालेल्या 'फिडे' (FIDE) महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत तिरंगा फडकवला आहे.

Who is R Vaishali Candidates Winner 2026 : भारताची ग्रँडमास्टर आर. वैशाली हिने सायप्रसमध्ये झालेल्या ‘फिडे’ (FIDE) महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत तिरंगा फडकवला आहे. या विजयासोबतच वैशाली ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. यासह तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीटही पक्के केले आहे. त्यामुळे भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी २०२६ हे वर्ष सुवर्णअक्षरांनी लिहिले जाणारे ठरले आहे.
वैशाली विश्वविजेत्या जू वेनजुन हिच्याशी भिडणार –
सायप्रसमध्ये पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत २४ वर्षीय आर. वैशालीने ८.५ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. तिने आपली प्रतिस्पर्धी बिबिसारा अस्सौबायेवा हिला अर्ध्या गुणाने मागे टाकत हा रोमांचक विजय साकारला. या विजयामुळे वैशाली आता वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद (World Championship) सामन्यात चीनच्या पाच वेळच्या विश्वविजेत्या जू वेनजुन हिच्याशी दोन हात करेल.
Initial reactions after Vaishali became Women’s World Championship Challenger!@chessvaishali – “Lot of things going on, I won’t be able to put it in words. It’s like a dream moment for me!
Mother Nagalakshmi – “No words – very happy!”@rpraggnachess – “Once she played c4, we… pic.twitter.com/pKOg44U1uf
— ChessBase India (@ChessbaseIndia) April 15, 2026
सहाव्या वर्षांपासून सुरू झालेला प्रवास –
Congratulations to R Vaishali on winning the Women’s Candidates and earning a shot at the World Championship! Wishing her the very best as she takes on Ju Wenjun – may her brilliance on the board inspire a new generation of young Indians to dream big and think bold. @FIDE_chess… pic.twitter.com/ywzeARl7QK
— Lokesh Nara (@naralokesh) April 16, 2026
२१ जून २००१ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या वैशालीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षांपासून बुद्धिबळाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच तिची बुद्धिमत्ता पटावर चमकू लागली होती. तिने अंडर-१२ आणि अंडर-१४ गटात मुलींचे जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. २०१८ मध्ये तिने वुमन ग्रँडमास्टर (WGM) आणि २०२१ मध्ये इंटरनॅशनल मास्टर (IM) ही पदवी मिळवली. २०२३ मध्ये कतार मास्टर्समधील शानदार कामगिरीनंतर ती भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर (GM) ठरली.
जगातील पहिली ‘ग्रँडमास्टर’ भाऊ-बहीण जोडी –
⭐️Vaishali Rameshbabu has won the FIDE Women’s Candidates 2026, earning the right to challenge for the Women’s World Chess Championship title!
The 23yr old becomes one of India’s finest chess success stories, her brother Praggnanandhaa is already a top-10 player in the world
— Nabila Jamal (@nabilajamal_) April 16, 2026
वैशालीचा धाकटा भाऊ आर. प्रज्ञानंद हा देखील जागतिक स्तरावरील नामवंत ग्रँडमास्टर आहे. एकाच वेळी ग्रँडमास्टर पदवी धारण करणारी ही जगातील पहिली भाऊ-बहीण जोडी ठरली आहे. प्रज्ञानंदने पुरुष गटात आपला दबदबा निर्माण केला असतानाच, वैशालीने आता कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून भारतीय बुद्धिबळाची मान उंचावली आहे. एकाच घरातील या दोन हिऱ्यांनी जागतिक बुद्धिबळ पटलावर भारताचे नाव अजरामर केले आहे.





