IND vs ENG : शुबमन गिलने मोडला विराट-सचिनचा विक्रम, SENA देशांमध्ये रचला नवा इतिहास!

IND vs ENG 2nd Test Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा एजबॅस्टन मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार गिलच्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५८७ धावांचा डोंगर उभारला आहे. या दरम्यारन शुबमन गिलने (२६९) कसोटी कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला आहे.
शुबमन गिल भारतासाठी SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला. शिवाय, तो भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा कर्णधारही बनला. अशा प्रकारे, त्याने एकाच खेळीत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचे महाविक्रम मोडले. इतकेच नव्हे, तर तो भारताचा पहिला असा फलंदाज ठरला, ज्याने इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये २५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली. सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूसह कोणताही अन्य भारतीय फलंदाज हे साध्य करू शकला नाही.
शुबमन गिलने मोडला सचिन-विराटचा विक्रम –
Innings Break!
A mighty batting display from #TeamIndia! 🙌 🙌
2⃣6⃣9⃣ for captain Shubman Gill
8⃣9⃣ for Ravindra Jadeja
8⃣7⃣ for Yashasvi Jaiswal
4⃣2⃣ for Washington SundarUpdates ▶️ https://t.co/Oxhg97g4BF#ENGvIND | @ShubmanGill | @imjadeja | @ybj_19 | @Sundarwashi5 pic.twitter.com/WkhwqLxXJB
— BCCI (@BCCI) July 3, 2025
गिलने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या SENA देशांमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. त्याने क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर, भारताचा टेस्ट क्रिकेटमधील भक्कम आधारस्तंभ राहुल द्रविड आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सिडनी येथे नाबाद ३४१ धावा केल्या होत्या, तर राहुल द्रविडने २००३ मध्ये अॅडलेड येथे २३३ धावांची खेळी केली होती. तसेच, सुनील गावस्कर यांनी १९७९ मध्ये ओव्हल येथे २२१ धावा केल्या होत्या. शुबमन गिलने २४२ धावा करताच या महान क्रिकेटपटूंना मागे टाकले.
हेही वाचा – Wimbledon 2025 : रोहन बोपण्णाची निराशा, युकी भांबरीची धमाकेदार सुरुवात!
भारतीय फलंदाजांची SENA देशांमधील कसोटी सामन्यांतील सर्वोच्च धावसंख्या:
- २६९ धावा – शुबमन गिल
- २४१ धावा – सचिन तेंडुलकर
- २३३ धावा – राहुल द्रविड
- २२१ धावा – सुनील गावस्कर
कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे फलंदाज:
- २६९ धावा – शुबमन गिल
- २५४ धावा – विराट कोहली
- २४३ धावा – विराट कोहली





