बंदचा आदेश धुडकावल्याने वालचंदनगर पोलिसांची कारवाई
भवानीनगर (पुणे) -जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन यांचे बंद आदेश असतानाही व्यापार पेठमधील दुकान सुरू ठेवल्याने भवानीनगर येथील आणि सणसर येथील व्यापाऱ्यांवर इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
इंदापूर तालुक्यामध्ये करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाच्या वतीने दि. 12 ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबत भवानीनगर येथील व सणसर येथील डॉक्टर आणि मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे वारंवार करोना याबाबत माहिती सांगत असून देखील काही व्यापारी या नियमांचे उल्लंघन करीत आहेत.
याबाबत भवनीनगर व्यापारपेठ येथील सोमनाथ जगतराव कपूर यांचे हार्डवेअर दुकान व सणसर येथील कैलास वसंत खाडे यांचे किराणामाल दुकान उघडे ठेवल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विना मास्क 92 वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून नऊ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.