पुणे -जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढाव्यातील अनुकूलनगरमध्ये घडली आहे. कार्तिक जाधव (वय २२) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाNयांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कार्तिक जाधव आणि सराईताची काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपींना असल्यामुळे होता. त्यातुन आज संध्याकाळी सहाच्या सुमारास आरोपींनी कार्तिकला कोंढाव्यातील अनुकूलनगरमध्ये गाठले.
त्याठिकाणी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपचारासाठी कार्तिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.