Umpire Murdered Visakhapatnam : धक्कादायक! क्रीडा विश्व हादरलं; ‘रन आऊट’च्या वादातून अंपायरलाच संपवलं
Umpire Murdered Visakhapatnam : क्रिकेटच्या मैदानावरील किरकोळ वादाचे रूपांतर निर्घृण हत्येत झाल्याने खळबळ उडाली आहे.

Umpire Murdered in Visakhapatnam Cricket Match : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान पंचाची (अंपायर) चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. खेळाडूंच्या वादात मध्यस्थी करणे २१ वर्षीय अंपायरच्या जीवावर बेतले आहे. या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. Umpire Murdered Visakhapatnam
नेमकं प्रकरण काय? Umpire Murdered Visakhapatnam
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यात २१ वर्षीय डोला अजित बाबू हा आपला मित्र बुडूमुरी चिरंजीवीसोबत पंचाची भूमिका बजावत होता. सामन्यादरम्यान एका ‘रन आऊट’ (Run Out)च्या निर्णयावरून मैदानावर खेळाडूंमध्ये जोरदार वाद सुरू झाला. अजित बाबू आणि चिरंजीवी यांनी मोठ्या सामंजस्याने हा वाद मिटवला आणि परिस्थिती शांत केली. मात्र, याच वेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कांता किशोर नावाच्या व्यक्तीने संतापाच्या भरात मैदानात येऊन पंचांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सामना संपल्यानंतर केला जीवघेणा हल्ला – Umpire Murdered Visakhapatnam

Umpire Murdered Visakhapatnam : धक्कादायक! क्रीडा विश्व हादरलं; ‘रन आऊट’च्या वादातून अंपायरलाच संपवलं
सामना संपल्यानंतर आरोपी कांता किशोरने वाद मिटवण्याच्या बहाण्याने अजित बाबू आणि चिरंजीवी यांना एका निर्जन ठिकाणी बोलावले. तिथे पुन्हा बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात किशोरने चाकू काढून दोघांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अजित बाबूच्या छातीवर खोलवर वार करण्यात आला, तर स्वतःचा बचाव करताना चिरंजीवी गंभीर जखमी झाला.
जखमींना तातडीने विशाखापट्टणम येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये (Apollo Hospital) दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान अजित बाबूचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. आयपीएलच्या काळात क्रिकेटवेड शिगेला असताना घडलेल्या या घटनेने खेळातील खिलाडूवृत्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.





