England Beats India : क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं! इंग्लंडने भारताला टी-२० मालिकेत लोळवलं; गोलंदाजांनी कापलं नाक
England Beats India : या विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-० अशी अभेद्य आणि ऐतिहासिक आघाडी घेत मालिका आपल्या नावे केली आहे.

IND vs ENG 4th T20I Bristol Match England Beats India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-० अशी अभेद्य आणि ऐतिहासिक आघाडी घेत मालिका आपल्या नावे केली आहे. क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडने भारताला द्विपक्षीय टी-२० मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चौथ्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने ८० धावांची झुंजार खेळी केली खरी, मात्र इतर भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे आणि तिन्ही विभागांतील अपयशामुळे भारताचा दारुण पराभव झाला.
१२ वर्षांनंतर टीम इंडियाला पाहावा लागला काळा दिवस – (England Beats India)
या पराभवामुळे भारतीय क्रिकेटच्या नावावर अनेक नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे. जवळपास १२ वर्षांनंतर भारताला इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये इंग्लंडने एका सामन्याच्या मालिकेत भारताला हरवले होते, परंतु दोन किंवा अधिक सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लंडने भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच, गेल्या ७ वर्षांत भारताने सलग दोन टी-२० मालिका गमावल्या आहेत. आधी आयर्लंडविरुद्ध २-० आणि आता इंग्लंडमध्ये पराभव पत्करावा लागल्याने, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने सलग ५ टी-२० सामने गमावण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे.
IND vs ENG T20 series | Bristol: England (159/1) beat India (158/7) by 9 wickets in 4th T20I to seal the series 3-0. pic.twitter.com/bU8R7euzSx
— ANI (@ANI) July 9, 2026
श्रेयस अय्यरची एकाकी झुंज; बाकीचे फलंदाज फ्लॉप – (England Beats India)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अव्वल फळी पूर्णपणे कोलमडल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारत ४९ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची वादळी खेळी केली. यामुळे भारताला २० षटकांत ७ बाद १५८ धावांपर्यंत पोहोचता आले. श्रेयसव्यतिरिक्त दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक २२ धावा शिवम दुबेने केल्या. अभिषेक शर्माने १६ तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १५ धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
हॅरी ब्रुक आणि फिल सॉल्टचे वादळ; १४ षटकांत खेळ खल्लास – (England Beats India)
England handed India a crushing defeat.
With this loss, Team India’s unbeaten record against England that had stood for 12 years also came to an end.
Image Credit: Jiostar #indvseng pic.twitter.com/eLFjV4SIQz
— CricInformer (@CricInformer) July 9, 2026
प्रत्युत्तरात १५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पिसे काढली. इंग्लंडने अवघ्या १३.५ (१४) षटकांत १ विकेट गमावून १५९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने ३५ चेंडूंत नाबाद ७९ धावांची (८ चौकार, ४ षटकार) स्फोटक खेळी केली, तर सलामीवीर फिल सॉल्टने ४२ चेंडूंत ५९ धावा कुटल्या. भारताकडून एकमेव विकेट अर्शदीप सिंगला मिळाली.





