CSK World Record : चेन्नई सुपर किंग्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! पराभवानंतरही RCBच्या नाकावर टिच्चून ‘हा’ इतिहास रचणारा जगातील पहिला संघ
CSK World Record : चेन्नई सुपर किंग्सने (CSK) टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका अद्भूत जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.

CSK World Record 9 Players Hit Sixes IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ११ व्या सामन्यात आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला असला, तरी सीएसकेने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एका अद्भूत जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. ५ एप्रिल रोजी बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी हार न मानण्याची वृत्ती दाखवत विश्वविक्रम प्रस्थापित केला. CSK World Record
सीएसकेचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड – CSK World Record
या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला सलग तिसऱ्या पराभवाचा धक्का बसला असला, तरी त्यांच्या फलंदाजांनी एक अनोखा पराक्रम केला आहे. आरसीबीने दिलेल्या २५१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या तब्बल ९ फलंदाजांनी किमान एक षटकार (सिक्सर) ठोकला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात ९ वेगवेगळ्या फलंदाजांनी षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ असून, हा आता एक नवा जागतिक विक्रम ठरला आहे.
सिक्सर किंग्जचा नवा विक्रम –
🎥 Glimpses of a fighting knock from Jamie Overton 👏
He departs after scoring 37 (16)!#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/e2uRbDV7Pj
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2026
चेन्नईच्या डावात आयुष म्हात्रे आणि मॅट हेन्री वगळता मैदानात उतरलेल्या प्रत्येक फलंदाजाने चेंडू सीमापार धाडला. चेन्नईने आपल्या डावात एकूण ११ षटकार ठोकले. यामध्ये सर्फराझ खान (५० धावा), प्रशांत वीर (४८ धावा) आणि जेमी ओव्हरटन (३७ धावा) यांनी आक्रमक खेळ केला. यापूर्वी कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा लीग टी-२० सामन्यात एकाच संघातील ९ खेळाडूंना षटकार मारता आले नव्हते.
आरसीबीने ४३ धावांनी मारली बाजी – CSK World Record
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने टिम डेव्हिडच्या २५ चेंडूत ७० धावा (८ षटकार) आणि देवदत्त पडिक्कलच्या ५० धावांच्या जोरावर ३ बाद २५० धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ १९.४ षटकात २०७ धावांवर गारद झाला. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले, तर जेकब डफी आणि क्रृणाल पंड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत संघाला ४३ धावांनी विजय मिळवून दिला. जरी चेन्नईने हा सामना गमावला असला, तरी त्यांच्या ‘सिक्सर’ विक्रमाची चर्चा सध्या क्रिकेट विश्वात रंगली आहे.





