पुणे – दिवसभर ऊन, तर रात्री आणि पहाटे थंडी असे वातावरण सध्या शहरात आहे. तर पुढील तीन दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील 24 तासांत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे.
उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे वातावरणात गारवा होता. पुढील तीन दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारी/ सायंकाळी
आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर शनिवारी सकाळी धुके पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुण्यात 29.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 13.1 अंश सेल्सिअस किमान नोंद आहे.