शहाजानपूर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद याच्यावे बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरूणीला शहाजापूर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. मात्र याबाबत काहीही माहिती देण्यास पोलिस तयार नाहीत.
पोलिसांच्या गराड्यात ही तरूणी अलाहाबाद न्यायलयात जाताना दिसली. तिने पोलिसांनी अटक करू नये म्हणून अटकपूर्व जामीनासाठी अलाहाबाद उच्च न्यायलयात अर्ज केला होता. मात्र तिला दिलासा देण्यास न्यायलयाने नकार दिला. योग्यय न्यायलयात योग्य अर्ज करा असा सल्ला तिला दिला.स्थानिक न्यायलयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला.