- खासदार अमोल कोल्हे : भविष्यात काय, यांचे उत्तर नाहीच
पिंपरी – केंद्र सरकारच्या पातळीवरून करोनबाबत धोरणात्मक कोणतीही “पॉलिसी’ अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. कसलीही सुसूत्रता येत नाही. निश्चित धोरण ठरविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप खासदार अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी (दि. 15) पिंपरीत आयोजित पत्रकार परिषदेत केला. पुढे भविष्यात काय, यांचे उत्तर मिळत नाही, हे सुधारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार अमोल कोल्हे यांनी आज महापालिकेतील “करोना वॉररुम’ला भेट दिली. आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले की, स्थलांतरीत कामगारांची जी स्थिती आहे. त्यास पूर्णपणे केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. 30 दिवसांत सतत सूचना बदलत होत्या. सातत्य नसल्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातूनच अनेक चुकीच्या घटना घडल्या. देशभरातील राज्य शासनांबरोबर केंद्राने योग्य समन्वय साधून लॉकडाऊनमधून लवकर बाहेर पडण्याची गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
करोना संकटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सहकार्य करत करोना विरोधात दिलेला लढा कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जात असून, महापालिका लवकरच मोबाईल टेस्टिंग व्हॅन सुरू करणार असल्याने सर्वांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दुकाने, उद्योग सुरू करण्यासाठी भीती आहे. परंतु, अर्थव्यवस्था सुरू करणे गरजेचे आहे. योग्य ती काळजी घेऊनच पावले उचलावी लागतील. संसर्ग वाढणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. तर, चित्रपट, सिनेसृष्टीला खूप मोठा फटका बसला आहे. सरकार आजही या क्षेत्राकडे व्यावसायिक पद्धतीने पाहत नाही. या क्षेत्राला उभारी देणे आवश्यक आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.
Actor amol kolhe jya pakshat ahet tyanni tyachi history tapasavi, ghotalyanchi padtalni, ani te malika madhe shobtat mazhya mate publicity mule mp banavla, celebrity lokanni desh chalavla tr mg bakichyanni ky karaicha
Kharya arthat news channels khaas karun tumhala vinnati tumhi khari news dakhva. Karan lokan parynt khari mahiti nasun tumhi khallelya paishyanchi khoti batmi pohchavtait. Tumcha kaam nahi shikhavat. Tumhala tumchya jagechi janiv karavtoe