पिंपरी, दि. 6 – सीए अरविंद भोसले यांना नेहरूनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाने कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक लघुपटांची निर्मिती करून त्यामधून सामाजिक प्रबोधन केल्याने हा सन्मान करण्यात आला. नेहरूनगर येथील झिरो बॉईज चौकातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुंडाप्पा टेकूर यांच्या हस्ते सीए अरविंद भोसले यांना कार्यगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. नितिन लोंढे, रमेश कानिटकर, किसन हेळकर, पोपट आढाव, सुहास चिपळूणकर, रामचंद्र जाधव आदी या वेळी उपस्थित होते. सीए अरविंद भोसले यांनी लहरायेगा तिरंगा या गीताद्वारे बालकामगार व शाळाबाह्य मुलांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. यापूर्वी देखील त्यांनी मोबाइल ऍडिक्शन, बॉयकॉट ट्रेस, आय ओपनर व महिलांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर आधारित असलेला भावना व शाळाबाह्य मुलांवर आधारित असलेला निशाण हे लघुपट बनविले आहेत. या लघुपटाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधन करण्याचे काम अनेक दिवसापासून केले. निशाण व भावना लघुपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.