Recharge Plan Rs 107: 107 रुपयांमध्ये तुम्ही 40 दिवस इंटरनेट, कॉलिंग आणि इतर सुविधांचा आनंद घेऊ शकता. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल चा हा प्लॅन आहे. सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी कंपनीकडून अनेक स्वस्त योजना ऑफर केल्या जातात. यापैकी एक रु. 107 रिचार्ज प्लॅन आहे (BSNL Rs 107 Prepaid Recharge Plan). यासोबत तुम्हाला कॉलिंग आणि डेटाचा फायदाही मिळतो.
BSNL Rs 107 Recharge Plan Benefits –
BSNL चा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 40 दिवसांच्या वैधतेसह येतो. या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला 3 जीबी डेटाचा लाभ मिळेल. याशिवाय दिल्ली आणि मुंबई सर्कलसह लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगवर 100 मिनिटांची मोफत व्हॉइस कॉलिंग सुविधाही उपलब्ध आहे. इतकेच नाही तर प्लॅनसोबत 60 दिवसांची मोफत BSNL Tunes सेवा देखील उपलब्ध आहे. सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
BSNL Rs 229 Recharge Plan Benefits –
बीएसएनएलचा 229 रुपयांचा प्लान आहे. यामध्ये यूजर्सना 90 दिवसांची वैधता मिळते. तुम्ही दररोज 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुम्ही प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या डेटाचा लाभ देखील घेऊ शकता. प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाचा लाभ मिळतो.