लातूर – लातूर जिल्ह्यातील औसा येथे झालेल्या एका भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहे.
मृतांमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाचा उपचारासाठी घेवून जात असताना मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री भरधाव काळीपिवळी आणि बोलेरो जीप एकमेकांना धडकून झाला. या अपघातानंतर काळी-पिवळीला जोरदार धडक बसून ती रस्त्याच्या एका बाजूला पलटली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता.