Pune News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी निकालाची घोषणा होणार आहे. नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे, याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे व वडगाव मतदारसंघांत सुट्टी राहणार आहे. केंद्र व निमशासकीय कार्यालये, बँका यांनाही सुट्टी लागू असून पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. हेही वाचा : प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तींचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार अनावरण ; ७७ फूट उंच मूर्तीची खासियत काय ? वाचा