Pune District : गाळपात ‘बारामती अॅग्रो’, उतार्यात ‘सोमेश्वर’
Pune District : गाळपाच्याबाबत बारामती ग्रो कारखाना सर्वात पुढे असून साखर उतार्यात सोमेश्वर कारखाना आघाडीवर आहे. तर साखर उत्पादनात माळेगाव कारखान्याने बाजी मारली आहे.

प्रभात वृत्तसेवा
पुणे : राज्यातील ऊसगाळप हंगाम सुरू होऊन महिन्याभराहून अधिकचा काळ लोटल्यानंतर पुण्यातील साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ४१ लाख ६६ हजार ५७८ टन उसाचे गाळप झाले असून त्यातून ९.४९ टक्केच्या साखर उतार्याने 3 लाख ९५ हजार 57५ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपाच्याबाबत बारामती ग्रो कारखाना सर्वात पुढे असून साखर उतार्यात सोमेश्वर कारखाना आघाडीवर आहे. तर साखर उत्पादनात माळेगाव कारखान्याने बाजी मारली आहे.
जिल्ह्यातील १५ कारखान्यांपैकी १२ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे, असे साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीवरून दिसते. उर्वरित तीन कारखान्यांपैकी अनुराज शुगर्स आणि कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याची ऊस गाळपाची नोंद उपलब्ध नाही. १२ कारखान्यांमध्ये आठ सहकारी आणि चार खासगी कारखान्यांचा समावेश आहे. सहकारी कारखान्यांनी आजअखेरपर्यंत २२ लाख ५० हजार ५०२ टन उसाचे गाळप करून 2 लाख २५ हजार ३१० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. त्यांचा निव्वळ साखर उतारा १०.१ टक्के आहे. दुसरीकडे, खासगी कारखान्यांनी१९ लाख १६ हजार ७६ टन उसाचे गाळप करून १ लाख ७० हजार २६५ टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांचा साखर उतारा ८.८९ टक्के आहे.
टॉप फाईव्ह
सर्वाधिक ऊस गाळप करणारे पाच कारखाने
कारखाने क्षमता दैंनदिन प्रत्यक्ष गाळप (मेट्रीक टन)
बारामती अॅग्रो १८,००० ७,०८,८३८
दौंड शुगर १७,५०० ६,१५,८५०
श्री साईप्रिया १५,००० ३,६१,५७६
सोमेश्वर कारखाना ७,५०० ३,५०,०७९
छत्रपती कारखाना ६५०० ३,२८,४९२
सर्वाधिक साखर उतारा असणारे पाच कारखाने
1. सोमेश्वर साखर कारखाना ११.१४ टक्के
2. श्रीनाथ म्हस्कोबा १०.६८ टक्के
3. माळेगाव साखर कारखाना १०.३७ टक्के
4. भीमाशंकर साखर कारखाना १०.३० टक्के
5. छत्रपती साखर कारखाना ९.९० टक्के
सर्वाधिक साखर उत्पादन (टनामध्ये)
1. माळेगाव साखर कारखाना ३३,२००
2. सोमेश्वर साखर कारखाना ३८,९९०
3. श्री साईप्रिया ३६,०६०
4. छत्रपती साखर कारखाना ३२,५१६
5. बारामती अॅग्रो ६१०१३





