देहूगाव, ( वार्ताहर) – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान वैशिष्ट्यपूर्ण तथा दलित वस्ती सुधार योजना सन २०२३ – २४ योजने अंतर्गत देहू परिसरातील २४ कोटी,२६ लाख रुपये निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी ( दि.२५ ) करण्यात आले.
देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमदार शेळके यांचे सुमारे ३५ फुट उंचीचा भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्य प्रवेशद्वारा लगत असणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नामफलकांचे तसेच नगरपंचायतीच्या अग्निशमन वाहन व ट्रॅक्टरचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर विविध प्रभागातील कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी मान्यवर उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विवेक काळोखे, नगरसेवक योगेश काळोखे, योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे आदींनी नियोजन केले.
मंजूर कमे व नाव
देहू नगरपंचायत हद्दीत वार्ड क्र. १४ येथे विश्वमाया कॉम्लेक्स शेजारील मोहन काळोखे घर ते सिद्धेश्वर मंदिर, वॉर्ड क्र. १४ येथे विजय आटोळे घर ते प्रवीण खंडागळे यांच्या घरापर्यंत व जुना पालखी मार्ग, वॉर्ड क्र. १४ अंतर्गत सायली विहार ते सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता करणे.
जुना पालखी मार्ग कंद पाटील चौक ते काळोखे मळा रस्ता व ड्रेनेज लाईन, देहू कमान ते संतकृपा मंगल कार्यालयपर्यंत ड्रेनेज लाईन करणे. प्रभाग क्र. १४ मधील पाण्याची टाकी ते केशव पचपिडपर्यंत ड्रेनेज लाईन करणे. रायगड सोसायटी मुरली मगद घर ते मनोहर शिगवण यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
वॉर्ड क्र. ८ अंतर्गत पुरंदर कॉलनी डहाळे ते जगताप यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे. एकदंत हॉसिंग सोसायटी ते काकडे यांच्या घरापर्यंत, शिवनेरी कॉलनी दहिवल ते सागर काळोखे यांच्या घरापर्यंत, सुंदर गल्ली माणिक मोरे ते प्रमोद गोलांडे रस्ता कांक्रीटीकरण करणे. पांडे वाडा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे. निसर्ग सोसायटी संजय भसे यांच्या घरापासून ते मेटकरी यांच्या घरापर्यंत, कंद पाटील नगर क्र.५ देहू आळंदी रोड ते पवार यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.
प्रभाग क्र.७ मधील ओम साई सोसायटी देहू आळंदी रोड जुंदरे यांच्या घरापर्यंत, प्रभाग क्र. ७ मधील रामभाऊ कंद यांच्या घरापासून ते शेख यांच्या घरापर्यंत, ओमकार सोसायटी प्रवीण भसे ते लोळगे यांच्या घरापर्यंत / मेन रोड ते धन् मुसूडगे घरापर्यंत, प्रभाग क्र. ७ मधील अजय कंद ते तथास्थु पॅराडाईजपर्यंत, नवचैतन्य सोसायटी ते ढोरे यांचे घरापर्यंत रस्ता कांक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन करणे.
भीमाशंकर सोसायटी ते सागर भसे घर ते प्रितम कंद घरापर्यंत गटर काम करणे. संत वैभव सोसायटी जावेद मुलानी ते उंबरदंड सर घरापर्यंत, अथर्व विश्व बिल्डिंग ते देहू आळंदी रोड रस्ता कांकीटीकरण करणे. हगवणे आळी अंतर्गत विलास माळी यांच्या घरापासून ते सरकारी दवाखाना रस्ता करणे. सुतार आळी रस्ता शहाजी बुचडे यांच्या घरापानून ते बाळासाहेब काळोखे यांच्या घरापर्यत रस्ता कांक्रीटीकरण करणे.मान्यवर.