पुणे – गेल्या तीन दशकांपासून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आघाडीवर असणाऱ्या सयाजी उद्योग समूहाने आता हॉटेल इंस्ड्रीत देखील मोठ्या प्रमाणात आपले वर्चस्व स्थापन केल्याचं दिसून येत आहे. हा समूह सध्या ‘सयाजी हॉटेल्स, सयाजी इफोटेल आणि सयाजी सनराईज’ या नावाने भारतभर 22 ठिकाणी ब्रँड चालवतो आहे.
प्रत्येक ठिकाणी आलिशान रूम, बँक्वेट आणि सर्व दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे, बँक्वेट हॉलमध्ये खासगी पार्टी, विवाह, संस्मरणीय प्रसंग तसेच बोर्ड रूममध्ये कॉर्पोरेट मिटिंग आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करता येतील अशी खास सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘सयाजी हॉटेल्स’ हा भारताचा सातत्याने प्रगती करत असलेला प्रिमिअर ब्रँड आहे. तुमच्या मागणीप्रमाणे सर्व सेवांबरोबरच 4 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्सच्या श्रेणीमध्ये आदरातिथ्य आणि समृद्धीचे नवीन मानांकन देण्यासाठी ‘सयाजी हॉटेल्स’ प्रसिदध् आहे. आणि त्यामुळेच आता ‘सयाजी हॉटेल्स’ सर्वांच्या आवडीचे ठिकाणी बनले आहे.
दरम्यान, ‘सयाजी हॉटेल्स’ला भेट किंवा ऑनलाईन संपर्क करण्यासाठी तुम्ही www.sayajihotels.com या माध्यमाचा देखील आधार घेऊ शकता. तसेच, इफोटेल सयाजी, पो. सारोळा, 369, ता. भोर, सारोळा, पुणे – 412206, महाराष्ट्र. या ठिकाणी जाऊन स्वतः भेट देऊ शकता.