वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरबड्स आता भारतात खूप लोकप्रिय झाले आहेत. एक काळ होता जेव्हा वायरलेस इयरबड्स खूप महाग असत, परंतु आता ते अगदी कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. टेक मार्केटमध्ये, Realme, iQoo, Redmi, Bot आणि Noise सारख्या कंपन्या आहेत ज्या कमी किमतीत मजबूत आवाज आणि टिकाऊपणासह इयरबड प्रदान करत आहेत. तुम्हीही कमी किमतीत सर्वोत्तम वायरलेस इअरफोन्स शोधत असाल तर तुमच्यासाठी पुढली माहिती आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला 2 हजारांखालील पाच सर्वोत्तम इयरबड्सबद्दल सांगणार आहोत.
Truke Clarity 5
या बड्समध्ये सहा माइक आणि बाहेरील आवाज येणे बंद करण्याचा सपोर्ट आहे. Truke Clarity 5 ला 3 इक्वेलायझर मोड आणि 35ms लो लेटेंसी गेमिंग मोड देखील मिळतो. चांगल्या बास आणि स्पष्ट आवाजासाठी हा लोकप्रिय आहे. यात ब्लूटूथ 5.3 तंत्रज्ञान आणि ड्युअल कनेक्टिव्हिटी फीचरसाठी सपोर्ट आहे. बड्सची किंमत 1,499 रुपये आहे.
Portronics Harmonics Twins S6
तुम्हाला सर्वात कमी किमतीत IPX4 रेटिंग असलेले इअरबड्स हवे असतील, तर तुमच्यासाठी Portronics Harmonics Twins S6 हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यासह, 50 तासांचा प्लेबॅक टाईम, ब्लूटूथ V5.3 सपोर्ट, 10 मिमी ड्रायव्हर्स, 10 मिमी ड्रायव्हर्स आणि क्वाड-माइक सपोर्ट उपलब्ध आहेत. याची किंमत 1,099 रुपये आहे.
Realme Buds Air 3S
Realme Buds Air 3S तुमच्यासाठी 2 हजारांच्या किमतीत एक उत्तम पर्याय आहे. यासह, 11mm लिक्विड सिलिकॉन ट्रिपल टायटॅनियम बेस ड्रायवरचा सपोर्ट आहे. बड्सना AI ENC कॉल नॉइज रिडक्शन सपोर्टसह 4 इन-बिल्ट माइकचा सपोर्ट आहे. बड्स 30 तासांच्या बॅटरी लाईफसह आणि IPX5 रेटिंगसह येतात. बड्सची किंमत 2,499 रुपये आहे. परंतु ऑफरसह ते 2 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.
Noise Buds VS104 Max
तुम्हाला 2 हजारांपेक्षा कमी किमतीत चांगल्या प्रतीचे बड्स हवे असतील तर तुमच्यासाठी नॉईज बड्स VS104 Max हा योग्य पर्याय आहे. याची किंमत 1,699 रुपये आहे. 25dB पर्यंत असलेल्या बड्समध्ये ANC सपोर्ट आहे. इयरबड्स सीमलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वर्जन 5.3 आणि कॉल गुणवत्ता वाढवण्यासाठी क्वाड माइक ENC सह येतात. बड्सना 50ms लो-लेटन्सी, गेमिंग मोड आणि IPX5 रेटिंग मिळते. यासोबत 45 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो.
boAt Airdopes 170 TWS
तुम्हाला अधिक परवडणारे इअरबड्स हवे असतील, तर boAt Airdopes 170 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. इयरबड्सची किंमत 1,499 रुपये आहे आणि 40 तासांची बॅटरी लाइफ आहे. बड्सना Quad Mic Enx Tech, Beast Mode, 13mm ड्रायव्हर्स, ASAP चार्ज, IPX4, IWP, टच कंट्रोल्स आणि ब्लूटूथ v5.3 साठी सपोर्ट मिळतो. याच्या मदतीने तुम्हाला उत्तम बास मिळेल.