Eknath Shinde : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज तो दिवस आला असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अधिकृत राजकीय युतीची घोषणा करणार आहेत. याबाबत काल उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक्सवरून ट्वीट करत माहिती दिली होती. दोन्ही भाऊ वरळीतील हॅाटेल ब्लू सी वरळी येथे एकत्र येणार आहेत. त्याच ठिकाणी पत्रकार परिषद देखील पार पडणार असल्याची माहिती आहे. तत्पूर्वी ठाकरे बंधू शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आज दोघेही भाऊ राजकीय युतीद्वारे एकत्र येत असल्याने अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीवर नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. काही आघाड्या खुर्ची आणि सत्तेसाठी असतात. मात्र आमची युती विचारांची असून विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. आमचे विकासाला प्राधान्य असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसेच महापालिका निवडणुकीत मुबंईसह राज्यातील २९ महापालिकेवर युतीचाच्या विकासाचा भगवा फडकेल असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूंच्या नेत्यांंमध्ये जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरू होते. जागावाटपातील काही जागांवर एकमत होत नव्हते. अखेर जागावाटपाचा तिढा सुटला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढविणार आहेत. आता आज दोघेही भाऊ राजकीय युतीद्वारे एकत्र येत असल्याने काय बोलणर याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी रणनीती आखली आहे. एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? लोकशाहीमध्ये सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येजण करत असतो. काही आघाड्या खुर्ची आणि सत्तेसाठी असतात. मात्र, आमची युती विचारांची आहे आमची युती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. आमची युती विकासाला प्राधान्य देणारी आहे. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये युतीतीचा विकासाचा भगवा फडकेल. मराठी माणसाला हाकलण्याचे काम कुणी केले? मुंबईकर मुंबई बाहेर जाण्यासाठी कुणामुळे गेले? अनेक वर्ष मुंबईत कोणाची सत्ता होती? या मुंबईकरांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आहोत. मुंबईकर काम करण्याऱ्यामागे मुंबईकर उभे राहतात. हेही वाचा : चार मुलं जन्माला घाला, सांगणाऱ्या नवनीत राणांना अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या “सुरुवात स्वतःपासून करा”