Raj Thackeray : मनसैनिकांचा हिरमोड ! राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द; स्वतः सांगितलं नेमकं कारण….

Raj Thackeray | Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराच्या तोफा 18 नोव्हेंबरला थंडावणार आहेत. त्याआधीचा हा शेवटचा विकेंड सुरू असल्याने सर्वच पक्षांतील सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे.
मतदारसंघात फिरणे, मुलाखती देणे अन् प्रचारसभांना संबोधित करण्यात उमेदवार आणि स्टार प्रचारकांचा वेळ जात आहे. यामध्ये आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. आजही विविध नेत्यांच्या सभा नियोजित आहेत.
मात्र, अश्यातच महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. शिवाजी पार्क येथील 17 तारखेच्या सभेसाठी सरकारकडून परवानगी आलेली नाही. त्यामुळे दीड दिवस त्या सभेकरता उरलेला आहे.
दीड दिवसांत या सभा करणं कठीण होऊन बसतंय. त्यामुळे 17 तारखेची सभा करत नाहीत. त्याऐवजी मुंबई ठाण्यातील मतदारसंघात दौरा सुरू होणार असल्याचं स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरे यांनी यादिवशी मुंबई आणि ठाणे या भागात सर्व मतदारसंघात दौरा करणार असल्याचं जाहीर केलं. शिवाजी पार्कवर प्रचाराची सांगता सभा आयोजित करण्यासाठी मनसेकडून परवागनी मागण्यात आली होती. मात्र, परवानगी न मिळाल्यानं मनसेची ती सभा होत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
17 तारखेला आता दीड दिवसांचा वेळ उरला आहे. दीड दिवसात सभेचं नियोजन होत नाही. आणि त्यात सर्व कामाला लागतील तर मग त्यांना प्रचाराला वेळ मिळणार नाही. त्याशिवाय माझी भाषण खूप झाली आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले. सभेला परवानगी न मिळणं यात राजकारणं नसावं, असं वाटतंय. असं देखील राज ठाकरेंनी म्हंटलं आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यात नेमके काय?
जाहिरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे.
चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
माझ्या हातात ही गोष्ट येईल या आशेने आपण जाहीरनामा समोर ठेवतो. इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.





