कॅनबेरा :- ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख विरोधी पक्षातून वरिष्ठ सिनेटरची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. डेव्हिड वॅन असे या वरिष्ठ सिनेटरचे नाव असून त्यांच्यावर लिंडा थॉर्प या सिनेट सदस्य महिलेने लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता.
डेव्हिड यांनी संसदेतच आपल्याशी गैरवर्तन केले होते. संसद ही महिलांसाठी असुरक्षित बनली असल्याचा आरोप त्यांनी बुधवारी केला होता. त्यानंतर सिनेटर डेव्हिड वॅन यांना पुराणमतवादी लिबरल पक्षातून काढून टाकले असल्याचे विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी सांगितले. वॅन हे सिनेटर म्हणून कायम राहिले आहेत, परंतु यापुढे ते लिबरल पक्षाचे प्रतिनिधी असणार नाहीत.
संसदीय विशेषाधिकारांतर्गत केलेले आरोप वॅन यांनी नाकारले आहेत विशेषाधिकारांतर्गत सिनेटमध्ये काहीही बोलल्याबद्दल बदनामीचा दावा केला जाऊ शकत नाही.
संसद भवनात अनेक दशकांपासून गुंडगिरी, छळ आणि लैंगिक अत्याचार सहन करणाऱ्या संसदेतील कर्मचाऱ्यांची राजकीय नेत्यांनी गेल्या वर्षी माफी मागितली होती. राजकीय नेत्यांचे असे वर्तन राष्ट्रीय लैंगिक भेदभाव आयुक्तांनी केलेल्या तपासणीत उघड झाले होते.