वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या पथकाने आपल्या पृथ्वीच्या वातावरणापेक्षा मोठ्या आकाराचे आणि आपल्या सूर्यापेक्षा कमी वयाचे सूर्याभोवती फिरणाऱ्या तीन ग्रह शोधून काधले आहेत. आपल्या आकाशगंगेने पृथ्वीच्या अवकाशातील एकतृतीयांश अवकाश व्यापले आहे. त्या आकाशगंगेच्या 3 टक्क्यांपेक्षाही कमी तारे असलेली मीन-एरिडॅनस स्ट्रीम नावाची आकाशगंगा अलिकडेच शोधून काढली गेली आहे.
याच आकाशगंगेमध्ये हे तीन सूर्य आहेत. या नव्याने शोधून काढलेल्या सूर्यमालेबद्दलची माहिती “ऍस्ट्रोनॉमिकल जर्नल’मध्ये सविस्तरपणे देण्यात आली आहे. या आकाशगंगेबद्दल अधिक सखोल संशोधन होणे बाकी आहे. त्यातील ग्रहांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. नासाच्या “ट्रान्सिटिंग एक्सप्लोप्नेट सर्व्हे सॅटेलाईट अर्थात ‘टिस’ ने ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 च्या दरम्यान या सूर्यमालेतील ग्रहांची छायाचित्रे घेतली होती.
या सूर्यमालेतील सूर्याला “टीओआय 451′ असे नाव देण्यात आले आहे. हा सूर्य आणि त्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांबाबत 2019 आणि 2020 च्या दरम्यान नासाच्या स्पित्झर स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून निरीक्षण केले गेले होते. ही खगोलशास्त्रीय दुर्बिण आता संशोधन कार्यातून निवृत्त झाली आहे. या दुर्बिणीव्यतिरिक्त अन्य साधनांद्वारेही या ग्रहांचे निरीक्षण केले गेले होते.
या ग्रहांवर अतिथंड वातावरण, धूळ आणि खडकाळ पृष्ठभाग असल्याचे “नासा’च्या “नीअर अर्थ ऑब्जेक्ट वाईड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोनर’ अर्थात “निओवाईज’ या उपग्रहाने केलेल्या निरीक्षणात आढळले आहे. याशिवाय “टीओआय-451′ या ताऱ्याभोवती फिरत असलेले दोन लहान तारेही असल्याचेही अन्य निरीक्षणात आढळले आहे. या ग्रहमालेबद्दल अद्याप बरीच माहिती मिळवावी लागेल, असे अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरच्या हॅनोव्हरमधील डार्टमाउथ कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक मुख्य संशोधक एलिझाबेथ न्यूटन यांनी सांगितले.
ही ग्रहमाला केवळ 120 दशलक्ष वर्षांची आहे आणि पृथ्वीपासून 400 प्रकाश वर्षे दूर आहे. त्यामुळेच या ग्रहमालेविषयी अधिक सविस्तर अभ्यास करावा लागेल. या ग्रहमालेमध्ये 3 ग्रह आहेत. त्यांचा आकार पृथ्वीच्या दुप्पट आणि चौपट आहे. त्यामुळेच तेथे जीवसृष्टी असण्याबद्दल आशा निर्माण होते आहे आणि त्यासंदर्भातील संशोधन केले जायला हवे, असेही त्या म्हणाल्या.
“टीओआय-451′ ला खगोलशास्त्रज्ञांनी “सीडी-38 1467′ असे ओळखण्याचे नाव दिले आहे. तो तारा 400 प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या सूर्याच्या 95 टक्के त्याचे वस्तुमान आहे. मात्र तो 12 टक्के लहान आहे. त्यामुळेच तो तुलनेने अधिक थंड आहे. आपल्या सूर्यापेक्षा त्यातून कमी उर्जा बाहेर पडते. त्या सूर्याची स्वतःभोवती फिरण्याचा वेग आपल्या सूर्यापेक्षा 5 पट अधिक आहे. त्या सूर्यापासून सर्वात जवळच्या ग्रह आपल्या बुधापेक्षा सूर्याच्या तीनपट अधिक जवळ आहे. त्यामुळे तेथील उष्णताही आपल्यापेक्षा अधिक आहे. सूर्याच्या अगदी जवळील ग्रहावरील तापमान 1,200 अंश सेल्सिअस तर सर्वात दूरच्या ग्रहाचे तापमान 450 अंश सेल्सिअस इतके आहे.
त्या सूर्याच्या जवळील पहिल्या ग्रह 451 बी ला सूर्याभोवती फिरण्यासाठी 1.9 दिवस लागतात. पृथ्वीपेक्षा त्याचा आकार 1.9 पट अधिक आहे. तर पृथ्वीपेक्षा त्याचे वस्तुमान दुप्पट ते 12 पट अधिक आहे. तर या ग्रहमालेतील दुसरा ग्रह “टीओआय 451 सी’ ला सूर्याभोवती फिरण्यासाठी 9.2 दिवस लागतात आणि तो पृथ्वीपासून तिप्पट मोठा आहे.
त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा तिप्पट ते 16 पट अधिक आहे. या ग्रहमालेतील सर्वात दूरचा आणि जगातील सर्वात मोठा ग्रह “टीओआय-451 डी’ ला सूर्याभोवती फिरण्यासाठी 16 दिवस लागतात. तर तो आपल्या पृथ्वीपेक्षा चौपट मोठा असून त्याचे वस्तुमान आपल्या पृथ्वीच्या चौपट ते 19 पट अधिक आहे. जवळपासच्या ताऱ्यांकडून तीव्र उष्णता मिळत असूनही इतके मोठे ग्रह भविष्यातही कायम रहातील, अशी खगोलशास्त्रज्ञांची अपेक्षा आहे.