मंचावर आले अन् खुर्चीवर बसताच…; बिहारमध्ये प्रचारसभेसाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांबाबत काय घडलं?

Devendra Fadanvis | बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या बिहारमध्ये प्रचार सभांना वेग आला आहे. बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये जाऊन खडगिया जिल्ह्यात निवडणूक प्रचार केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान प्रचारसभेदरम्यान मंचावर दाखल झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस मंचावरील खुर्चीवर बसताच तुटली. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एनडीएच्या प्रचारमोहिमेला वेग आला आहे. रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा क्षेत्रात एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या या सभेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि चिराग पासवान मंचावर दाखल झाले.
फडणवीसांसोबत चिराग पासवान यांचीही खुर्ची तुटली
परंतु मुख्यमंत्री फडणवीस मंचावर खुर्चीवर बसताना खुर्ची अचानक तुटली. मात्र नंतर फडणवीस आणि चिराग पासवान यांनी अभिवादन करत सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसरी खुर्ची मागवण्यात आली आणि सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या घटनेत कोणालाही काही दुखापत झाली नाही.
यावेळी भाषणादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, “बिहारची जनता विकासाची अपेक्षा करते आणि ती दिशा केवळ एनडीए देऊ शकते. महागठबंधनने गेल्या काळात फक्त भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवली आहे.” Devendra Fadanvis |
मात्र सध्या या घटनेचा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर विविध प्रतिक्रिया येत असून, काहींनी आयोजकांच्या मंच व्यवस्थेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. Devendra Fadanvis |
हेही वाचा:
अक्षय कुमार कार्तिक आर्यन अॅानस्क्रिन एकत्र दिसणार? भूल भुलैया 4 ची मोठी अपडेट समोर





