पुणे – पुणे वकिलांच्या ग्राहक सहकारी सोसायटीवर तज्ज्ञ संचालक पदी ऍड. विष्णू भिकू तापकीर आणि ऍड. जयराम तांबे यांची सर्वानुमते निवड झाली. या नियुक्तीचे पत्र दि पुणे लॉयर्स कंझुमर्स को-ऑफ सोसायटीचे चेअरमन ऍड. दादाभाऊ शेटे याचे हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गोरक्षनाथ काळे, पुणे बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे, बार असोशिएशनचे सर्व पदाधिकारी व सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.
निवडीनंतर दोन्ही तज्ज्ञ संचालक ऍड विष्णू तापकीर आणि ऍड जयराम तांबे यांचा सत्कार सोसायटी तर्फे सत्कार करण्यात आला. पुणे वकिलांची ग्राहक सोसायटी ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सोसायटी असून या सोसायटीमध्ये सुमारे 8 हजारावर वकील सभासद आहेत.
ऍड. विष्णू तापकीर हे गेली अनेक वर्ष सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ते वडमुखवाडी येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तसेच मरकळ येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून देखील कामकाज पाहत आहेत.