महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – सह्याद्रीच्या खोर्यातील महाबळेश्वर व प्रतापगड परिसरातील घनदाट जंगल आणि तेथील जैवविविधता ही निसर्गप्रेमींसाठी खास पर्वणीच असते. येथील वन्यजीवांचे थेट दर्शन होणे असे काही दुर्मिळ क्षण पाहण्याचे भाग्य काहींना लाभते. अशीच घटना प्रतापगडच्या घाटात घडली. रस्त्याच्या मधोमध तब्बल 8 फूट लांबीचे अजगर पाहून प्रवाशी घाबरले. मात्र, अजगर महाशय वाहनांच्या प्रखर प्रकाशात देखील शांतपणे मंदगतीने रस्ता ओलांडत राहिले आणि वाहन चालक व प्रवाशी या दुर्मिळ क्षणांचे साक्षीदार ठरले.
याबाबत अधिक वृत्त असे की, मंगळवार 7 मे रोजी रात्री प्रतापगडहून परत येत असताना महाबळेश्वरमधील काही स्थानिकांना रस्ता ओलांडत असणारा तब्बल 8 फुटाच्या अजगराचे दर्शन झाले. एवढे मोठे अजगर पाहिल्यानंतर प्रवाशी घाबरले मात्र अजगर मंदगतीने रस्ता ओलांडत होते. लाईटच्या झोतामुळे अजगर खूप एकाच जागी थांबले होते. त्यामुळे अजगराने रस्ता ओलांडेपर्यंत प्रवाशांना बराच वेळ वाटही पहावी लागली. मात्र एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार होत प्रवाशांनी हा थरार अनुभवला.
सह्याद्री पर्वत रागांचाच एक भाग असल्याने या रांगाचा महाबळेश्वर तालुक्यात बराच मोठा भाग हा जंगलांनी वेढला आहे. बरेच वन्य जीव या भागात आढळत असतात. महाबळेश्वर येथे सापांच्या बर्याच प्रजाती आढळून येत असून बिनविषारी सापामधील सर्वात मोठी प्रजाती म्हणजे भारतीय अजगर हे होय. भारतीय अजगर हा डलहशर्वीश्रश 1 यादीमध्ये येत असून महाबळेश्वर येथील बर्याच भागामध्ये अधून मधून अजगराचे दर्शन होत असते.
महाबळेश्वरात अधून मधून घडते दर्शन
या अजगरांची लांबी 18 फूट लांबीपर्यंत असू शकते. मादी एका वेळी 8 ते 100 अंडी घालते व 50 ते 70 दिवसात ही अंडी उबवली जातात. मादी अंडी उबाविण्यासाठी अंड्यांच्या भोवती वेटोळे घालून बसते. या अजगरांचा 30 वर्षांपर्यंत जीवन कालावधी असतो.
ससा, घूस, कुत्रा, हरीण, माकड यासारखे छोटे प्राणी हे अजगराचे मुख्य अन्न असून इतरवेळी सुस्त असणारा अजगर शिकारीच्या वेळेस तो बराच जलद गतीने शिकार पकडतो. मुख्यतः निशाचर असणारा हा जीव घनदाट जंगल भात शेती तसेच पाण्याच्या बाजूला असणार्या खडकाळ भाग पाणथळ प्रदेश अशा भागात आढळतो.