Amit Shah Pune Visit: काँग्रेसचे ३०० कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमानंतर मुक्तता
Amit Shah Pune Visit: मार्केट यार्ड आणि समर्थ पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त.

Amit Shah Pune Visit – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने सुरक्षेचा उपाय, तसेच कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेऊन पोलिसांनी ३०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून मध्यरात्री ताब्यात घेतले. शहा यांचा कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यकर्त्यांची मुक्तता केली. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवारी (१ ऑगस्ट) होता.
कार्यक्रमास शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शहा यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला होता. पोलिसांनी त्याला परवानगी परवानगी नाकारून मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर आंदोलनास परवानगी दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चवधरी, पालिकेतील गटनेते चंदू कदम यांच्यासह कार्यकर्ते, नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेले. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समर्थ पोलीस ठाण्यात नेले. मध्यरात्रीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठाण्यात नेण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.
युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, पर्वती ब्लाॅक काँग्रेसचे स्वप्नील नाईक, वडगाव शेरी ब्लाॅक काँग्रेसचे अध्यक्ष राजू ठोंबरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सद्दाम शेख, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष गौरव बाळंदे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांचे मोबाइल संच ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात घोषणाबाजी केली.
“गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून विविध पक्षाच्या ३०० कार्यकर्त्यांना शुक्रवारी ताब्यात घेतल. केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.”
– संजय दराडे, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस





