Credit Card History । आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या, ही योजना 1934 साली सुरू झाली त्यावेळी अमेरिकन एअरलाइन्स आणि एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने पहिले एअर ट्रॅव्हल कार्ड जारी केले होते. तुम्हाला माहित आहे का, 150 वर्षांपूर्वी एडवर्ड बेलामी नावाच्या विज्ञान कादंबरी लेखकाने वेळा आणि काळ प्रवासाच्या संकल्पनेवरील एक कादंबरी लिहिली होती. लुकिंग बॅकवर्ड 2000-1887 असे त्या कादंबरीचे नाव होते.
या 150 वर्षे जुन्या कादंबरीच्या नवव्या प्रकरणात लेखकाने क्रेडिट कार्डची संकल्पना मांडलेली आहे. तेच क्रेडिट कार्ड आपण आज वापरतोय त्यावेळीच्या समाजवादी विचारसरणीत बेलामीने प्रत्येक नागरिकाला समान पत मिळाली पाहिजे असा विचार मांडला होता. विसाव्या शतकाच्या मध्याला क्रेडिट कार्ड्स प्रत्यक्षात अस्तित्वात आली आणि 2023 मध्ये आपण आता क्रेडिट कार्ड बाबत कित्येक पावले पुढे गेलेलो आहोत. आता आपण क्रेडिट कार्डद्वारे बिल पे करू शकतो, अगदी आपल्या मोबाईल वरून किंवा बेडवर बसून देखील.
1934 साली अमेरिकन एअरलाइन्स आणि एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पहिले क्रेडिट कार्ड जारी केले. त्याचे नाव होते एअर ट्रॅव्हल कार्ड. या कार्डद्वारे प्रवासी आत्ता खरेदी करा पैसे नंतर द्या असे भूमिका स्वीकारू शकत होते आणि या कार्डद्वारे खरेदी केलेल्या तिकिटांवर 15 टक्के सवलत मिळत असे. 1940 पर्यंत अमेरिकेतील सर्व प्रमुख प्रवासी हवाई वाहतूक कंपन्यानी एअर ट्रॅव्हल कार्ड जारी केले होते. ते 17 वेगवेगळ्या एअरलाइन्स साठी वापरले जाऊ शकत होते.
आता 2023 मध्ये तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर विमान प्रवासासाठी करू शकता, त्याखेरीज घराच्या अगदी जवळ दोन पाच किलोमीटरवर जायचे असेल तरीही त्याचे भाडे देण्यासाठी देखील क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. पुन्हा या क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या सवलती, रिवॉर्ड्स पॉईंट मिळत असतात. जगभर चालणारे पहिले क्रेडिट कार्ड 1950 साली डायनर्स क्लब ने जारी केले. या कार्डने बिल पे केल्यास ग्राहकांना निवडक रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये सवलत मिळत असे. पुन्हा या कार्डचे बिल महिन्याच्या अखेरीस ग्राहकाला प्राप्त होत असे, मात्र डायनास क्लबचे कार्ड हे सध्याच्या प्लास्टिकच्या क्रेडिट कार्ड सारखे नव्हते. त्या ऐवजी इथे पुठ्ठ्यापासून बनवलेले होते. त्यावर कार्ड मालकाचे नाव आणि नंबर छापलेला असे आणि मागील बाजूस ग्राहकाची सही असल्यास ते कार्ड वैध मानले जाईल. यापुढे क्रेडिट कार्ड मध्ये काय अभिनव कल्पना येईल हे सांगता येत नाही मात्र भारतात आणि जगभरातही क्रेडिट कार्ड अतिशय लोकप्रिय ठरलेली आहेत.
क्रेडिट कार्ड वापरणे ही आजकाल सर्रास बाब झाली असली, तरी काही काळापूर्वी मात्र ती अगदी विशेष सुविधा होती. खास उच्चभ्रू वर्गापुरती ती मर्यादित होती. आता वाढलेली स्पर्धा, डिजिटल पेमेंटची सर्वव्यापी सुविधा, उच्च उत्पन्न वर्गाचे वाढलेले प्रमाण, नव्या पिढीची जीवनशैली आदी कारणांमुळे क्रेडिट कार्डचा प्रसार समाजाच्या सर्व स्तरांत झाला आहे. रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०२३ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात ९.१३ कोटी क्रेडीट कार्ड सक्रीय होती. जुलै २०२२ मध्ये ही संख्या ७.८ कोटी एवढी होती. त्यात वर्षभरात १७ टकक्यांनी वाढ झाल्याचे दिसते.
मात्र, क्रेडिट कार्ड वापरण्याचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत. क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा चांगला लाभ होऊ शकतो. हळूहळू सर्वच राष्ट्रीयीकृत बँका, परदेशी बँका आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊ लागल्या व आता क्रेडिट कार्ड ही उच्चभ्रूंची मक्तेदारी न राहता सर्वांसाठीच क्रेडिट कार्ड सहजगत्या उपलब्ध होऊ लागले आहे. सध्या आपल्या देशात सुमारे आठ कोटी क्रेडिट कार्ड वितरीत झाले असून, आजकाल उच्च मध्यमवर्गीय व उच्चभ्रू लोकांकडे किमान एक किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड असल्याचे दिसून येते.